अल्पवयीन मुलीचे अपहरण; दोघांवर गुन्हा दाखल
By Admin | Updated: December 20, 2014 22:55 IST2014-12-20T22:55:36+5:302014-12-20T22:55:36+5:30
अल्पवयीन मुलीचे अपहरण; दोघांवर गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीचे अपहरण; दोघांवर गुन्हा दाखल
वणी : अल्पवयीन मुलीस आमिष दाखवून तिचे अपहरण केल्याची फिर्याद दाखल झाल्याने दोन संशयितावर वणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड येथील दिलीप सुकदेव गाढवे, बागड्या मंगळू गायकवाड या दोन संशयितानी दि. ११ डिसेंबर
रोजी सायंकाळी ५ वाजेच्या
सुमारास ओझरखेड गावातून
एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची तक्रार संजय कोंडाजी गांगोडे, राहणार ओझरखेड
यांनी दिली. पळवून नेणे, अपहरण करणे या कलमान्वये त्यांच्यावर
गुन्हा दाखल केला असून, या दोन
फरार संशयिताचा शोध पोलीस घेत आहेत. (वार्ताहर)