जिल्हा रुग्णालयातून अल्पवयीन मुलीचे अपहरण
By Admin | Updated: October 12, 2015 22:36 IST2015-10-12T22:33:11+5:302015-10-12T22:36:46+5:30
जिल्हा रुग्णालयातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

जिल्हा रुग्णालयातून अल्पवयीन मुलीचे अपहरण
नाशिक : येथील उंटवाडी बाल निरीक्षणगृहातील अल्पवयीन मुलीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता ही मुलगी बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे़ याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. उंटवाडी येथील बाल निरीक्षणगृहातील बारा वर्षीय मुलीचे पोट दुखत असल्याने काळजीवाहक शकुंतला रमेश जाधव यांनी शनिवारी (दि़१०) रात्री आठ वाजेच्या सुमारास तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात घेऊन गेल्या़ या मुलीचा केसपेपर काढण्यासाठी त्या गेल्या असता या दरम्यान ही मुलगी निघून गेली़ (प्रतिनिधी)