अल्पवयीन मुलीचे अपहरण
By Admin | Updated: June 20, 2016 00:11 IST2016-06-19T23:30:26+5:302016-06-20T00:11:44+5:30
अल्पवयीन मुलीचे अपहरण

अल्पवयीन मुलीचे अपहरण
नाशिक : दूध आणण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचे दुचाकीवरून अपहरण केल्याची घटना नाशिकरोड परिसरात घडली आहे़
याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित ललित पंडित खाडे (रा. मोरे मळा, जेलरोड) हा गत काही दिवसांपासून मुलीचा पाठलाग करीत होता़ शुक्रवारी (दि़१७) दुपारी चार वाजेच्या सुमारास दूध आणण्यासाठी दुकानात गेली असता खाडे याने दुचाकीवर बसवून पळवून नेल्याची फिर्याद पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.
याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अपहरणासह लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या महिनाभरात अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. (प्रतिनिधी)