अल्पवयीन मुलीचे फूस लावून अपहरण
By Admin | Updated: May 16, 2017 17:24 IST2017-05-16T17:24:29+5:302017-05-16T17:24:29+5:30
गंगापूररोड परिसरातील चोपडा लॉन्स भागातून मोनाली गणेश पाटील या १४ वर्षाच्या मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे.

अल्पवयीन मुलीचे फूस लावून अपहरण
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : गंगापूररोड परिसरातील चोपडा लॉन्स भागातून मोनाली गणेश पाटील या १४ वर्षाच्या मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुलीचे वडील गणेश वसंत पाटील यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयित आकाश अनिल पातुडे याच्या विरोधात फिर्याद नोंदवली असून, पोलिसांनी याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
गणेश पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अपहृत मोनाली रविवारी (दि.१४) रात्री ११ वाजेच्या सुमारास पाणी आणण्यास जाते, असे सांगून घरातून बाहेर पडली. त्यानंतर ती पुन्हा परतलीच नाही. तिच्या पालकांनी परिसरात शोधाशोध केली. मात्र, मोनालीचा काहीही थांगपत्ता लागला नाही. अखेर तिच्या पालकांनी सोमवारी (दि. १५) सकाळी सरकारवाडा पोलीस ठाणे गाठत आरोपी आकाश पातुडे याच्या विरोधात तक्रार दाखल केली. मुलगी व आरोपी हे दोघेही मूळचे वडाळागावातील रहिवासी असून, मुलीचे वडील मेहबूबनगरमधील रहिवासी आहे. अपहृत मुलगी व तिचे पालक कामासाठी गंगापूर परिसरात आले असता ही घटना घडली. पोलीस मोनाली आणि आकाश यांचा तपास करीत आहेत.