नाशिकहून बालकाचे अपहरण, आरोपीस मूर्तिजापुरात अटक
By Admin | Updated: October 1, 2016 18:27 IST2016-10-01T16:01:27+5:302016-10-01T18:27:35+5:30
पाथरी तालुक्यातील हातगाव नखाते येथून एका बालकाचे घरातील नोकराने नाशिक येथून अपहरण केल्याची घटना ३० सप्टेंबर रोजी घडली होती.

नाशिकहून बालकाचे अपहरण, आरोपीस मूर्तिजापुरात अटक
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मूर्तिजापूर, दि. १ - नाशिक जिल्हातील निफाड तालुक्यातील विंचुर येथून अडीच वर्षांच्या बालकाचे अपहरण करणाऱ्या एका मजुरास आज मूर्तिजापूर येथे अटक करण्यात आली.
जिया उल हक असे आरोपीचे नाव असून त्याने आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून शेख आफताब शेख इमाम याचे अपहरण केले होते। आरोपी त्या मुलाच्या वडिलांकडे कामाला होता.
आपल्या कामाचे सुमारे पाच लाख रुपये मिळावे यासाठी त्याने मुलाला पळवून नेऊन पाच लाख रुपयांची मागणी केली होती, असं पोलिसांनी सांगितलं।आज पहाटे पाच वाजता पोलिसांनी त्याला मूर्तिजापूर येथे अटक करून मुलाची सुखरूप सुटका केली