अपहरण प्रकरणी दलालासह दोघांना अटक

By Admin | Updated: October 2, 2015 00:01 IST2015-10-01T23:52:48+5:302015-10-02T00:01:17+5:30

अपहरण प्रकरणी दलालासह दोघांना अटक

In the kidnapping case, the two arrested with the broker | अपहरण प्रकरणी दलालासह दोघांना अटक

अपहरण प्रकरणी दलालासह दोघांना अटक

इंदिरानगर : भारतनगरच्या एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून पैशासाठी तिचा गुजरातमध्ये बळजबरीने विवाह लावल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत इंदिरानगर पोलिसांनी थेट अहमदाबाद येथून मुलीशी विवाह करणाऱ्या युवकासह दलालास अटक केली आहे. संशयितांना आज गुरुवारी (दि.१) न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने येत्या शुक्रवारपर्यंत (दि.६) पोलीस कोठडी सुनावली आहे.
भारतनगरमधील रहिवासी असलेल्या त्या चौदा वर्षीय मुलीची मैत्रीण संशयित आरोपी रिजवाना ऊर्फ राणू हमीद शेख यासह संशयित तौसिफ इमरान शहा याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या होत्या.

Web Title: In the kidnapping case, the two arrested with the broker