शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

अपहृत युवकाला जखमी अवस्थेत बेवारस सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 01:11 IST

दिंडोरीरोडवरील तारवालानगर येथे राहणाऱ्या एका ३० वर्षीय युवकाचे आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन लाख रुपयांसाठी अपहरण करून मारहाण केलेल्या अवस्थेत जळगाव मार्गावर घाटात बेवारसपणे फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि.२६) उघडकीस आला आहे.

पंचवटी : दिंडोरीरोडवरील तारवालानगर येथे राहणाऱ्या एका ३० वर्षीय युवकाचे आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन लाख रुपयांसाठी अपहरण करून मारहाण केलेल्या अवस्थेत जळगाव मार्गावर घाटात बेवारसपणे फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि.२६) उघडकीस आला आहे. याप्रकरणी आठ संशयितांवर अपहरण, खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मूळ जळगावनिवासी असलेले सध्या तारवालानगरमध्ये राहणारे बबन पंढरीनाथ महाजन यांनी धुळे मोहाडीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात येऊन गुन्हा आडगाव पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते मोलमजुरी करत असून, (दि.२३) दुपारी संशयित आरोपी मयूर वसंत सोनवणे, रवी, राहुल, एकनाथ व त्यांचे अन्य तीन साथीदारांसह आदींनी (नाव पत्ता माहीत नाही) महाजन याला एका टाटा सफारी कारमध्ये (एम.एच१९ सीडी७९९९) बळजबरीने बसवून जळगावला घेऊन गेले. रस्त्यात त्यांना जबर मारहाण करत दोन लाख रु पयांची मागणी केली.व महाजन याच्याजवळ असलेले दोन एटीएम व मोबाइल काढून घेत घाटात सोडून दिले. काही नागरिकांनी जखमी महाजनला रु ग्णालयात दाखल केले त्यानंतर त्यांनी दिलेल्या जबाबवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी हा गुन्हा आडगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग केला आहे. या गुन्ह्यातील आठ संशयितांविरुद्ध खंडणीसाठी अपहरण केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यामध्ये संशयित सोनवणे याने उपनिरीक्षक दीपक गिरमे यांच्याविरुद्ध खंडणी मागितल्याची तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत गिरमे यांची निलंबन करण्यात आले होते.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी