शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

खुंटेवाडीची बैलगाडी सातासमुद्रापार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 01:36 IST

कळवण : गावखेड्यातून नामशेष होत असलेल्या बैलगाडीचे आकर्षण आजही कायम असल्याने आता तिची प्रतिकृती शोपीस म्हणून घरे, कार्यालय व इतर अनेक ठिकाणी दिसू लागली आहे. यांतील बहुतांश कलात्मक बैलगाड्या देवळा तालुक्यातील खुंटेवाडी येथील विजय जाधव यांनी बनवल्या आहेत. त्यांच्या या कलाकृतीला परदेशातून मागणी होऊ लागली आहे. खुंटेवाडीची बैलगाडी सातासमुद्रापार जाऊ लागल्याने जाधवांच्या या ह्यविजयह्णचे कौतुक होत असून त्यांच्या या कलेची दखल घेत त्यांना नवउद्योजक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

ठळक मुद्देकोरीव कामाची दखल : नवउद्योजक पुरस्काराने गौरव

कळवण : गावखेड्यातून नामशेष होत असलेल्या बैलगाडीचे आकर्षण आजही कायम असल्याने आता तिची प्रतिकृती शोपीस म्हणून घरे, कार्यालय व इतर अनेक ठिकाणी दिसू लागली आहे. यांतील बहुतांश कलात्मक बैलगाड्या देवळा तालुक्यातील खुंटेवाडी येथील विजय जाधव यांनी बनवल्या आहेत. त्यांच्या या कलाकृतीला परदेशातून मागणी होऊ लागली आहे. खुंटेवाडीची बैलगाडी सातासमुद्रापार जाऊ लागल्याने जाधवांच्या या ह्यविजयह्णचे कौतुक होत असून त्यांच्या या कलेची दखल घेत त्यांना नवउद्योजक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.शेतकऱ्यांच्या जगण्याचा कधीकाळी बैल हा एकमेव आधार होता आणि बैलगाडी हेच साधन प्रत्येक कामासाठी वापरले जात असे. परंतु कालानुरूप बैल व गाडी मागे पडत गेले असले तरी त्यांच्या सोबतच्या आठवणी मात्र प्रत्येकाच्या मनात कायम आहेत. यामुळेच या बैलगाडींना देशांतर्गत तर मागणी आहेच; पण आता परदेशातूनही मागणी होऊ लागल्याने ती ग्लोबल झाली आहे.बैलगाडी पाठवल्या असून मलेशिया व इतर काही देशांतून बैलगाडी पाठवा असे संदेश जाधव यांना येत आहेत. ओमान, झांबिया या देशांसह बेळगाव, गुलबर्गा (कर्नाटक), तामिळनाडू, केरळ, पंजाब, छत्तीसगड यांच्यासह पुणे, मुंबई, रत्नागिरी, बुलडाणा, औरंगाबाद, सातारा, नाशिक आदी ठिकाणी या बैलगाड्या पोहचल्या आहेत. या कामात त्यांना पत्नी वंदना, मुलगा प्रणव यांचे सहकार्य लाभत आहे.सागवानी लाकूड, उत्कृष्ट दर्जाचे एमडीएफ प्लाय, फायबरचे बैल व शेतकरी कुटुंब, पितळेची चाकांची धाव व घुंगरू यातून ही बैलगाडी साकारली आहे. सूक्ष्म कोरीवकाम, रंगरंगोटी, आखीव-रेखीव, प्रमाणबद्ध व कुंदन नक्षीकाम असलेल्या लहान-मोठ्या तीन-चार आकारात या बैलगाड्या बनविल्या आहेत.खुंटेवाडीची बैलगाडी परदेशात जाऊ लागल्याने आमच्या गावाची ओळख वाढू लागली आहे. विजय जाधव यांच्या कलाकारीचा आम्हाला अभिमान आहे.- भाऊसाहेब पगार,उपसरपंच, खुंटेवाडी

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासbusinessव्यवसाय