शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कॉँग्रेसच्या खोसकरांनी रोखली गावितांची विजयी घोडदौड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 00:36 IST

इगतपुरी- त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात कॉँग्रेसच्या हिरामण खोसकर यांनी 31555 मतांची आघाडी घेत दहा वर्षे प्रतिनिधित्व केलेल्या विद्यमान आमदार व शिवसेनेच्या उमेदवार निर्मला गावित यांचा दारुण पराभव केला. प्रारंभी चौरंगी वाटणारी लढत प्रत्यक्षात दुरंगी झाल्याचे मतमोजणीनंतर स्पष्ट झाले.

घोटी : इगतपुरी- त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात कॉँग्रेसच्या हिरामण खोसकर यांनी 31555 मतांची आघाडी घेत दहा वर्षे प्रतिनिधित्व केलेल्या विद्यमान आमदार व शिवसेनेच्या उमेदवार निर्मला गावित यांचा दारुण पराभव केला.प्रारंभी चौरंगी वाटणारी लढत प्रत्यक्षात दुरंगी झाल्याचे मतमोजणीनंतर स्पष्ट झाले. काँग्रेस महाआघाडीचे हिरामण खोसकर यांना 86561 तर दहा वर्षे कॉँग्रेसकडून मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करुन यंदाची निवडणूक शिवसेनेकडून लढणाऱ्या निर्मला गावित यांना 55006 मते मिळाली. काँग्रेसमधून शिवसेनेत केलेले पक्षांतर, सेना- भाजप नेत्यांकडून अंतर्गत विरोधी काम यामुळे निर्मला गावित यांना पराभव पत्करावा लागला. विजयाचे क्षण येताच खोसकर यांच्या समर्थकांनी विजयाचा जल्लोष केला.विद्यमान आमदार निर्मला गावित यांनी ऐनवेळी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी केली, त्यामुळे या मतदारसंघाच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागून होते. राष्ट्रवादी मधून इंदिरा काँग्रेसमध्ये प्रवेश करून गोवर्धन गटाचे जिल्हा परिषद सदस्य हिरामण खोसकर यांनी उमेदवारी केली. प्रारंभी गावितांकडे एकतर्फी झुकणारी ही निवडणूक ऐन प्रचार काळात खोसकर यांनी चुरशीची केली. गुरुवारी नाशिकच्या कन्या विद्यालयात झालेल्या मतमोजणीत पहिल्या फेरीपासून शेवटपर्यंत खोसकर यांनी मतांची आघाडी घेऊन गावितांच्या विजयाची परंपरा खंडित केली.विजयाची तीन कारणे...1निर्मला गावित यांनी केलेल्या पक्षांतराचा निर्णायक फायदा घेण्यासाठी काँग्रेसने नेत्यांची फळी उभारुन महायुतीच्या विरोधात एकदिलाने काम केले.2साधी राहणी, साधे व्यक्तिमत्व असे व्यक्तिमत्त्व असलेल्या खोसकरांना सामान्य नागरिकांची सहानुभूती मिळाली.3गावित यांच्या घराणेशाहीमुळे मतदारसंघातील नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आल्याचा प्रचार तसेच सर्वपक्षीय असंतुष्ट एकत्र आणले.गावितांच्या पराभवाचे कारण...ऐनवेळी पक्षांतर करण्याचा निर्णय, अति आत्मविश्वास अंगलट आला. शिवसेना-भाजप नेत्यांनी उचललेला पराभवाचा विडा, सर्वपक्षीय नेत्यांनी खोसकर यांच्या पाठीशी प्रबळ ताकद उभी केली. गावितांच्या मर्जीतील लोकांचा मनमानी कारभार, एकतर्फी नियोजन, एकचालकानुवर्ती प्रचार यंत्रणा ही पराभवाची महत्त्वाची कारणे.२पराभूत उमेदवार पक्ष मिळालेली मते१ निर्मला गावित (शिवसेना) 55006२ योगेश शेवरे (मनसे) 6566३ लकी ऊर्फ लक्ष्मण जाधव (वंचित ब. आ.) 9975४ शिवराम खाणे (भा. ट्रा. पार्टी) 1461५ दत्तात्रय नारळे (अपक्ष) 767६ यशवंत पारधी (अपक्ष) 1278७ विकास शेंगाळ (अपक्ष) 1110८ शैला झोले (अपक्ष) २1506

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019igatpuri-acइगतपुरीcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाResult Day Assembly Electionनिकाल दिवस विधानसभा निवडणूक