खोबरे महागले, खोबरेल तेलही महागणार! नारळ उत्पादनात घट : अवकाळी पाऊस, गारपिटीचा परिणाम

By Admin | Updated: May 24, 2014 01:03 IST2014-05-23T23:47:05+5:302014-05-24T01:03:12+5:30

नाशिक : अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका नारळाच्या पिकालाही बसला असून, गेल्या दोन महिन्यांत खोबर्‍याचे दर दुपटीने वाढले आहेत. परिणामी, खोबरेल तेलाच्या दरातही वाढ झाली असून, तेल उत्पादक कंपन्यांनी आणखी दरवाढीचे संकेत दिले आहेत.

Khobre expensive, coconut oil will rise! Decrease in coconut production: Incidental rain, hailstorm effect | खोबरे महागले, खोबरेल तेलही महागणार! नारळ उत्पादनात घट : अवकाळी पाऊस, गारपिटीचा परिणाम

खोबरे महागले, खोबरेल तेलही महागणार! नारळ उत्पादनात घट : अवकाळी पाऊस, गारपिटीचा परिणाम

नाशिक : अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका नारळाच्या पिकालाही बसला असून, गेल्या दोन महिन्यांत खोबर्‍याचे दर दुपटीने वाढले आहेत. परिणामी, खोबरेल तेलाच्या दरातही वाढ झाली असून, तेल उत्पादक कंपन्यांनी आणखी दरवाढीचे संकेत दिले आहेत.
कोकण तसेच केरळ, तामिळनाडू भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे यंदा नारळाचे उत्पादन घटले आहे. कोकणातील रत्नागिरी परिसरात मोठ्या प्रमाणावर नारळाचे उत्पादन होते; परंतु यंदा माकडांच्या टोळ्यांनी नारळपिकाला मोठ्या प्रमाणावर लक्ष्य केल्याने नारळाच्या उत्पादनावर परिणाम झाला असून, अवकाळी पावसानेही पिकाला फटका बसला आहे. केरळमध्ये नारळाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते; परंतु उन्हाळ्यात केरळमधून कच्च्या शहाळ्यांना जास्त मागणी वाढल्याने उत्पादकांनी कच्च्या मालातूनच कमाईला पसंती दिल्याने नारळाची आवक घटली आहे. नारळाच्या पिकावर परिणाम झाल्याने खोबर्‍याचे भाव गेल्या दोन महिन्यांत दुपटीने वाढले आहेत. दोन महिन्यांपूर्वी फटका राजापुरी (काळी पाठ) व मद्रास (लाल पाठ) खोबर्‍याचे दर प्रतिकिलो ९५ ते १३० च्या दरम्यान होते. आता खोबर्‍याचे दर २०० ते २२० रुपये प्रतिकिलोवर जाऊन पोहोचले आहेत. उन्हाळ्यात मसाल्यासाठी खोबर्‍याची मागणी असते; परंतु दर दुपटीने वाढल्याने ग्राहकांचे अंदाजपत्रक कोलमडले आहे. खोबर्‍याबरोबरच खोबरेल तेलातही भाववाढ झाली आहे. दोन महिन्यांत वीस रुपयांनी दरवाढ झाली आहे. मात्र पॅराशूटसारख्या सर्वाधिक खपाच्या तेल कंपनीने आणखी भाववाढीचे संकेत दिले आहेत. ५०० एम.एल. पॅराशूट खोबरेल तेलाची बाटली १६६ रुपयांवरून १८० रुपये, तर २५० एम.एल. तेलाची बाटली ६९ वरून ८४ रुपयांवर जाऊन पोहोचणार आहे. पॅराशूटचे पाऊचही १८ रुपयांवरून २७ रुपयांवर जाऊन पोहोचणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
आरोग्यदायी खोबरेल तेल
खोबरेल तेलाचा वापर केसांच्या पोषणासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. याशिवाय त्वचेच्या संरक्षणासाठीही तेलाचा उपयोग केला जातो. खोबरेल तेल हा दैनंदिन वापराच्या वस्तूंमध्ये महत्त्वाचा घटक असल्याने त्याचा वापर आवश्यकच मानला जातो. खोबरेल तेलाच्या दरात वाढ झाली असली, तरी त्याचा वापर टाळता येणे शक्य नाही; परंतु डोक्याला चपाचप तेल चोपणार्‍यांना मात्र भाववाढीमुळे हात आखडता घ्यावा लागणार असल्याचे दिसते.

Web Title: Khobre expensive, coconut oil will rise! Decrease in coconut production: Incidental rain, hailstorm effect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.