खेडगाव ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत पोपट महाले विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 19:26 IST2019-06-24T19:25:48+5:302019-06-24T19:26:03+5:30
खेडगाव : येथील प्रभाग क्र मांक २ मधील रिक्त जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत पोपट हरिभाऊ महाले हे ३०७ मताच्या फरकाने निवडून आले. रविवारी (दिन् २३) मतदान पार पडले. एकूण ११९२ पैकी ९०८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्या पैकी पोपट महाले यांना ६०७ तर रमेश गांगुर्डे यांना २९८ मते पडली. तर ३ मतदान नोटाला पडले.

खेडगाव ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत पोपट महाले विजयी
खेडगाव : येथील प्रभाग क्र मांक २ मधील रिक्त जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत पोपट हरिभाऊ महाले हे ३०७ मताच्या फरकाने निवडून आले.
रविवारी (दिन् २३) मतदान पार पडले. एकूण ११९२ पैकी ९०८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्या पैकी पोपट महाले यांना ६०७ तर रमेश गांगुर्डे यांना २९८ मते पडली. तर ३ मतदान नोटाला पडले.
खेडगाव ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसची सत्ता असून ह्या पोटनिवडणुकीत श्रीराम शेटे, दत्तात्रेय पाटील, अनिल ठुबे, प्रशांत पाटील यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले होते. परंतु अपेक्षीत यश मिळाले नाही.
विरोधी गटाकडून पंचायत समिती सभापती एकनाथ खराटे, सुरेश डोखळे, जयराम डोखळे यांच्याकडे प्रचाराची धुरा होती. तर सत्ताधारी गटाकडून ग्रामपंचायत सदस्य अनिल ठुबे, सुनील शेटे, प्रशांत पाटील, भीका उगले, संदीप बारहाते, भाऊसाहेब धूम अश्या अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. विजयाची माळ पोपट महाले यांच्या गळ्यात पडली. त्यानंतर सर्व ग्रामस्थांनी विजयी उमेदवाराचे अभिनंदन केले.
(फोटो २४ पोपट महाले)