खेडगावला रंगला पतंगोत्सव

By Admin | Updated: January 17, 2016 22:24 IST2016-01-17T22:22:54+5:302016-01-17T22:24:44+5:30

खेडगावला रंगला पतंगोत्सव

Khedgala Rangala kite festival | खेडगावला रंगला पतंगोत्सव

खेडगावला रंगला पतंगोत्सव

दिंडोरी : तालुक्यातील खेडगाव येथे मकरसंक्रांतीनिमित्त प्रथमच गावातील तरुणाईकडून पतंगोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. अनेक तरु णांनी व लहान मुलांनी उत्सवात भाग घेत पतंगबाजीचा आनंद लुटला. उत्कृष्ट पतंगप्रेमींना बक्षिसांचे वाटप करण्यात आले.
महोत्सवात रंगीबेरंगी पतंग उडवत पतंग काटाकाटीचा खेळ रंगला. यावेळी डीजेच्या तालावर नृत्य करत आनंद साजरा केला गेला. उत्कृष्ट पाच पतंगप्रेमींना विजेते घोषित करण्यात आले. या पहिल्याच पतंगोत्सवाला पतंगप्रेमींचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. अक्षय पाटील, अभिजित बारहाते, समीर मणियार, जितू परदेशी, स्वप्नील वाघ, करण धुळे, किरण लाहित्कार, विशाल कुमावत, तेजस पवार, स्वागत भवर, शुभम कुमावत आदिंनी पतंगोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी डॉ. प्रदीप तिडके, शरद डोखळे, अभिजित नरडे, तुषार दवंगे आदिंनी त्यास प्रोत्साहन दिले. आभार अक्षय पाटील यांनी मानले. (वार्ताहर)

Web Title: Khedgala Rangala kite festival