सरकारी व जिल्हा परिषद बॅँक अध्यक्षपदी खातळे
By Admin | Updated: November 17, 2015 23:42 IST2015-11-17T23:41:16+5:302015-11-17T23:42:47+5:30
चौथ्यांदा निवड : उपाध्यक्षपदी बाळासाहेब ठाकरे बिनविरोध

सरकारी व जिल्हा परिषद बॅँक अध्यक्षपदी खातळे
नाशिक : नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बॅँकेच्या अध्यक्षपदी चौथ्यांदा भाऊसाहेब लक्ष्मण खातळे व उपाध्यक्षपदी बाळासाहेब गोविंदराव ठाकरे- पाटील यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निबंधक मनीषा खैरनार यांचे अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
बॅँकेच्या अध्यक्षपदासाठी भाऊसाहेब खातळे यांच्या नावाची सूचना उत्तमराव गांगुर्डे यांनी मांडली. त्यास प्रमोद निरगुडे यांनी अनुमोदन दिले, तर उपाध्यक्षपदासाठी बाळासाहेब ठाकरे- पाटील यांच्या नावाची सूचना शिरीष भालेराव यांनी, तर बाळासाहेब ठाकरे यांचा सत्कार उत्तमराव गागुंर्डे यांनी केला. मावळते अध्यक्ष उत्तमराव देशमाने यांनी त्यांच्या कार्यकाळात उत्कृष्ठ कामकाज करून चार शाखा व प्रशासकीय कार्यालय सुरू केल्याबद्दल त्यांचा सत्कार बॅँकेचे ज्येष्ठ संचालक महेश आव्हाड यांनी, तर मावळते उपाध्यक्ष बबनराव भोसले यांचा सत्कार संचालक दिलीप मोरे यांनी केला. या निवडीप्रसंगी रमेश राख, सुभाष पवार, एन. डी. सानप, रमाकांत अलई, महेंद्र बाऱ्हे, तसेच सभासद शेखर धनक, शोभा खैरनार, अनिता खर्डे, विमलताई घोडके, बाळासाहेब कोठुळे, अनिल राठी, सुनील पवार, आर. एन. पाटील, वसंत मुंगीकर, श्रीकृष्ण पोतदार, गोटीराम खैरनार, बाळासाहेब टिळे, गणेश गांगुर्डे, संदीप दराडे, बाळासाहेब इंगोले, विक्रम पिंगळे, अजित आव्हाड, भाऊसाहेब पवार, विजय सोपे, अनिल ससाणे, अमित आडके, दत्तात्रय मदणे, विलास शिंदे भागचंद सांगळे, सुनील पवार, रंजना शिंदे आदि उपस्थित होते.