लोकमत न्यूज नेटवर्कसायगाव : येवला तालुक्यातील खिर्डीसाठे येथील पाझर तलावात एकलव्य संघटनेच्या पुढाकाराने सुमारे २५० डब्बे म्हणजेच दोन लाख मत्स्यबीज सोडण्यात आले. पाच ते सहा महिन्यानंतर येथे मच्छेमारी व्यवसायाला सुरु वात होईल. या व्यवसायातुन गावातील सुमारे २० कुटुंबांना सहा महिन्यांपर्यंत रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती एकलव्य संघटनेचे तालुकाध्यक्ष रामकृष्ण निकम, उपाध्यक्ष मारूती मोरे यांनी दिली. पाझर तलावांचे साठे भरल्यावर खिर्डीसाठे प्रमाणेच तालुक्यातील कोळगाव, डोंगरगाव, सावरगाव आदी मोठ्या पाझर तलांवा मधून अधिकाधिक मच्छबीज सोडण्याचा संकल्प तालुक्यातील एकलव्य संघटनेने केला आहे.याप्रसंगी एकलव्य संघटनेचे कार्याध्यक्ष शांताराम पवार, विजय माळी, संतोष माळी, अण्णा मोरे, बबन मोरे, भाऊसाहेब माळी, लक्ष्मण मोरे, संजय माळी, विनोद मोरे, वसंत मोरे, नवनाथ मोरे, मिच्छंद्र मोरे, गोरख मोरे, संजय मोरे, रावसाहेब मोरे, गोविंदा मोरे, जालिंदर मोरे, संदीप मोरे, भावराव मोरे, शिवलाल मोरे आदी्रसह आदिवासी बांधव उपस्थित होते.रोजगारासाठीची भटकंती थांबली मागील वर्षीही येथे कोंबडा, कतला, मरळ आदी जातींचे मच्छबीज सोडण्यात आले होते. धरणात चांगला पाणीसाठा असल्याने, व मच्छी खाद्य सोडल्याने माशांची चांगल्या प्रकारे वाढ झाली होती. त्यामुळे डिसेंबर ते आत्ता जुलै मिहन्यापर्यंत मच्छीमारी व्यवसाय चांगल्या प्रकारे सुरू आहे. तालुक्यातील स्थानिक आठवडे बाजारात येथील माशांना चांगलीच मागणी आहे. इतर मार्केट पेक्षा स्वस्त व ताजा मासा तालुक्यात उपलब्ध होत असल्याने दिवसेंदिवस ग्राहकांची संख्या वाढत आहे. मागील वर्षाच्या यशस्वी मच्छ व्यवसायामुळे आदिवाशीचा आत्मविश्वास वाढला आहे. रोजगार मिळवण्यासाठीची त्यांची भटकंती थांबली आहे.
खिर्डीसाठे धरणात सोडले दोन लक्ष मत्स्यबीज!
By admin | Updated: July 7, 2017 00:36 IST