शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

खंडेबा टेकडी कुस्तीच्या दंगलीत जाधव मानकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 01:08 IST

बजरंगबली व खंडेराव महाराज यांच्या नावाचा जयघोष करत व मल्लानी आपले दंड थोपटत प्रतिस्पर्ध्याला दिलेले आव्हान प्रेक्षकांचा मिळणार प्रतिसाद यामुळे येथील खंडोबा टेकडीवर रंगलेल्या कुस्ती स्पर्धा रोमहर्षक झाल्या़ अंतिम मानाच्या कुस्तीत पिंपळगाव बसवंतच्या संदीप जाधव या पहिलवानाने शेणीतच्या धनाजी जाधव यास तुल्यबळ लढत देत चितपट करत विजय मिळविला.

ठळक मुद्देतुल्यबळ लढत : खंडेराव महाराज यात्रोत्सव

देवळाली कॅम्प : बजरंगबली व खंडेराव महाराज यांच्या नावाचा जयघोष करत व मल्लानी आपले दंड थोपटत प्रतिस्पर्ध्याला दिलेले आव्हान प्रेक्षकांचा मिळणार प्रतिसाद यामुळे येथील खंडोबा टेकडीवर रंगलेल्या कुस्ती स्पर्धा रोमहर्षक झाल्या़ अंतिम मानाच्या कुस्तीत पिंपळगाव बसवंतच्या संदीप जाधव या पहिलवानाने शेणीतच्या धनाजी जाधव यास तुल्यबळ लढत देत चितपट करत विजय मिळविला.खंडोबायात्रेत परंपरेनुसार दंगली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. या मानाच्या कुस्तीच्या दंगलीसाठी नाशिकसह शिंगवे बहुला, भगूर, पिंपळगाव खांब, साकूर आदि भागातील कुस्तीपटूंनी हजेरी लावत डावपेच दाखवले. स्पर्धेतील अंतिम व यात्रोत्सवाच्या कुस्त्यांमध्ये सलग दुसऱ्यांदा विजेता ठरलेला संदीप जाधव यास बळवंत गोडसे, प्रकाश आमले, उत्तम मांडे, वस्ताद भाऊसाहेब मोजाड, सतीश मेवानी, विठ्ठल कांडेकर, रतन पाळदे, सचिन गावंडे, वाजिद सय्यद आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. पंच म्हणून सचिन आमले, प्रवीण पाळदे आदींनी काम बघितले. मोठ्या संख्येने कुस्तीप्रेमी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी कमलाकर आमले, नितीन आमले, प्रशांत म्हस्के, रोहित गायकवाड, सचिन आमले, सचिन झुटे, संजय गोडसे, रतन पाळदे, संदीप गांवडे आदी प्रयत्नशील होते.पहिलवान मुलींच्या स्पर्धायावर्षी प्रथमच शिंगवे बहुला येथील वस्ताद स्व.पै.पंढरीनाथ पाळदे यांच्या स्मरणार्थ साकूर, भगूर व नाशिकमधून आलेल्या पहिलवान मुलींच्या स्पर्धा व छोट्या गटातील कुस्त्यादेखील प्रेक्षणीय ठरल्या.

टॅग्स :NashikनाशिकWrestlingकुस्ती