खंबाळे येथे खंडोबा महाराज यात्रोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 18:52 IST2019-01-11T18:51:09+5:302019-01-11T18:52:02+5:30
सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथील ग्रामदैवत श्री खंडोबा महाराज यात्रोत्सवास शनिवारी (दि. १२) प्रारंभ होत आहे. दोन दिवस चालणाऱ्या यात्रा काळात विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यात्रोत्सव समितीच्या वतीने देण्यात आली.

खंबाळे येथे खंडोबा महाराज यात्रोत्सव
मºहळच्या प्रतिजेजुरी म्हणून ओळखल्या जाणाºया खंडोबाचा पहिला मुक्काम खंबाळे येथे झाल्याची जुनी आख्यायिका आहेत. परिसरातील सर्वात मोठी यात्रा खंबाळे येथे असते. यात्रेच्या पार्श्वभूमीवर गावात साफसफाई करण्यात आली आहे. मंदिर व परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. गावातील चौका चौकांत पथदीप बसविण्यात आले असल्याची माहिती यात्रा कमिटीचे अध्यक्ष व उपसरपंच भाऊसाहेब आंधळे यांनी दिली.