खंडोबा महाराज यात्रोत्सवास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 01:02 IST2020-01-10T22:42:27+5:302020-01-11T01:02:20+5:30
अवघ्या महाराष्टÑाचे ग्रामदैवत खंडेराव महाराज यात्रोत्सवास प्रारंभ झाला. प्रतिजेजुरी समजल्या जाणाºया श्रीक्षेत्र चंदनपुरी येथील खंडेराय मंदिरात राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा करण्यात आली. प्रसंगी चंदनपुरीच्या सरपंच योगीता अहिरे, सदस्य व ग्रामस्थ, मल्हार भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. अवघी चंदनपुरी यळकोट यळकोट जय मल्हारच्या निनादाने दुमदुमून गेली तर भंडाºयाच्या उधळणीमुळे चंदनपुरी पंचक्रोशीला सोनेरी किनार प्राप्त झाली आहे.

मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी येथे श्रीखंडोबा महाराजांची महाआरती करताना कृषिमंत्री दादा भुसे. समवेत पत्नी अनिता भुसे.
मालेगाव कॅम्प : अवघ्या महाराष्टÑाचे ग्रामदैवत खंडेराव महाराज यात्रोत्सवास प्रारंभ झाला. प्रतिजेजुरी समजल्या जाणाºया श्रीक्षेत्र चंदनपुरी येथील खंडेराय मंदिरात राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा करण्यात आली. प्रसंगी चंदनपुरीच्या सरपंच योगीता अहिरे, सदस्य व ग्रामस्थ, मल्हार भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. अवघी चंदनपुरी यळकोट यळकोट जय मल्हारच्या निनादाने दुमदुमून गेली तर भंडाºयाच्या उधळणीमुळे चंदनपुरी पंचक्रोशीला सोनेरी किनार प्राप्त झाली आहे.
खंडेरायाचे मूळ स्थान जेजुरीनंतर प्रतिजेजुरी श्रीक्षेत्र चंदनपुरी येथे गेल्या महिन्यापासून यात्रोत्सवाची तयारी चंदनपुरी ग्रामपालिका, जय मल्हार ट्रस्ट, महसूल, पोलीस प्रशासनातर्फे सुरू होती. ९ तारखेस सकाळी जेजुरी येथून पदयात्रा करीत मशाल ज्योतीचे शहरात आगमन झाले. मनमाड चौफुली ते चंदनपुरी गावापर्यंत मशाल ज्योतीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली तर मंदिरात धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. आज १० तारखेस शुक्रवारी पौष पौर्णिमेच्या मुहूर्तावर यात्रोत्सवास प्रारंभ झाला. सकाळी देवतांच्या मुखवट्यांची पालखी मिरवणूक मंदिर परिसर व गावातून काढण्यात आली. मिरवणुकीत हजारो मल्हार भक्त सामील झाले होते. मुखवटे मंदिरात आल्यावर मान्यवरांच्या हस्ते पूजन झाल्यावर मल्हारभक्तांसाठी दर्शन खुले करण्यात आले. चंदनपुरीत यात्रोत्सवाच्या अगोदर अनेक भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती तर आज रात्री उशिरा ते पहाटेपासून भक्तांनी रांग लावली होती. पहिल्याच दिवशी एक ते दीड लाख नागरिकांनी यात्रेस हजेरी लावल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. यात्रेनिमित्त प्रशासनातर्फे वीजपुरवठा, पाणीपुरवठ्यासह परिसराला जोडणाºया रस्त्यांची डागडुजी करण्यात आली. पथदीप लावण्यात आले. मंदिर परिसरात अतिगर्दीचा त्रास टाळण्यासाठी स्टीलच्या जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मंदिराच्या मोकळ्या जागेत भक्तांसाठी तळी भरणे, नवसपूर्ती, देवभेट, कोटम भरणा, देवाची काठी आदी धार्मिक विधी करण्याची सोय करण्यात आली आहे. विधीमुळे खोबरे, भंडाराची उधळणमुळे अवघे मंदिर व परिसर पिवळे झाले आहे. गोडीशेव, रेवडी यावर ताव मारताना दिसत आहे. यात्रेत करमणूक करण्यासाठी मोठे झोके, पाळणे, चक्रीझुला, जादूचे प्रयोग आदी आले आहेत तर काही दिवसांनी महाराष्टÑातील प्रख्यात तमाशा फड येणार असल्याचे सांगितले. यात्रेत गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी गिरणापूल शालिमार चौफुली आदी परिसरातून वाहतूक वळवण्यात आली आहे. अतिरिक्त पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात्रोत्सव प्रारंभ प्रसंगी ज्येष्ठ सदस्य राजेंद्र पाटील, राजू अहिरे, उपसरपंच कैलास शेलार, सदस्य सुभाष पवार, मनोहर जोपळे, विनोद शेलार, समाधान उशिरे, बापू हरपळे, महिला सदस्या अलका पवार, विमलबाई पवार, मंगळाबाई पवार, आशाबाई मांडवडे, रोशना सूर्यवंशी, केतकी सूर्यवंशी, उज्ज्वला शेलार यांच्यासह ग्रामसेवक टी.एम. बच्छाव, शालिंदर जीवरक, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ व मल्हार भक्त उपस्थित
होते.