खंडोबा महाराज नवरात्रोत्सवास प्रारंभ

By Admin | Updated: December 12, 2015 23:36 IST2015-12-12T23:34:33+5:302015-12-12T23:36:37+5:30

शहरातील विविध मंदिरे सजली

Khandoba Maharaj started the Navratri festival | खंडोबा महाराज नवरात्रोत्सवास प्रारंभ

खंडोबा महाराज नवरात्रोत्सवास प्रारंभ

नाशिक : येळकोट येळकोट, जय मल्हार.. अशा जयघोषाने शनिवार (दि.१२) मार्गशीर्ष प्रतिपदेपासून खंडेराव महाराज नवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ झाला. गोदाकिनारी असलेल्या खंडोबा महाराज मंदिरात शनिवारी सकाळी ६ वाजता महापूजा आणि अभिषेक करून पारंपरिक पद्धतीने खंडोबा देवाचे घट बसविण्यात आले.
मार्गशीर्ष प्रतिपदा ते मार्गशीर्ष षष्ठी या दिवसांमध्ये खंडोबा नवरात्राच्या पार्श्वभूमीवर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, सोमवारी (दि.१४) लघुरुद्राभिषेक आणि मंत्र जागराचा कार्यक्रम होणार आहे. मार्गशीर्ष षष्ठी अर्थात चंपाषष्ठी गुरुवारी (दि.१७) सकाळी ७ वाजता खंडोबा देवाच्या चांदीच्या टाकाची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून, भाविकांसाठी दिवसभर खंडोबा देवाच्या टाकाचे दर्शन घेता येणार आहे.
या दिवशी चंपाषष्ठी असल्याने चातुर्मास पाळणारे भाविक खंडोबा देवाला कांद्याची पात, वांग्याचे भरीत आणि भाकरी यांचा नैवेद्य अर्पण करून प्रसाद ग्रहण करणार आहेत. यादिवशी खंडोबा यात्रेचेदेखील आयोजन करण्यात आले असून, या महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन सोमनाथ बेळे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Khandoba Maharaj started the Navratri festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.