खमताणे-नवेगाव रस्ता बनला धोकेदायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 22:34 IST2019-03-02T22:34:09+5:302019-03-02T22:34:52+5:30
खमताणे : बागलाण परिसरात रस्त्याच्या दुरु स्तीची कामे वेगाने सुरू असली तरी खमताणे-नवेगाव रस्त्याची अवस्था दयनिय असल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा ठरत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दखल घेऊन सदर रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी सर्व राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांसह खमताणे ग्रामस्थांनी केली आहे.

खमताणे-नवेगाव रस्ता बनला धोकेदायक
खमताणे : बागलाण परिसरात रस्त्याच्या दुरु स्तीची कामे वेगाने सुरू असली तरी खमताणे-नवेगाव रस्त्याची अवस्था दयनिय असल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा ठरत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दखल घेऊन सदर रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी सर्व राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांसह खमताणे ग्रामस्थांनी केली आहे.
खमताणे- नवेगाव ररस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना प्रवास करताना कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांमुळे या रस्त्यावरील वाहतूकही मंदावली आहे. रात्रीच्या वेळी खड्डे दिसत नसल्याने दुचाकी वाहनांसह चारचाकी वाहनांचे अपघात होत आहेत. खड्ड्यांमुळे अनेकांना मणक्याचे आजार उद्भले आहेत. बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने रस्ता खराब झाला आहे. प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे.
रस्त्याच्या दुतर्फा झाडेझुडपांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे चालकांना समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने अपघात होत आहे. खराब रस्त्यामुळे विद्यार्थ्यांना रोज शाळेत पोहोचायला उशीर होत आहे.
शेतमाल वाहतुकीच्या गाड्यांचे पाटे तुटत आहे. सटाणा तालुक्याचे शहर असल्याने नवेगाव परिसरातील शेतकरी आपल्या शासकीय व खासगी कामकाजांसाठी याच मार्गाचा अवलंब करत असल्याने या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. मात्र रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. खड्डे ऐवढे मोठे आहे की त्यांनी रस्त्याचा अर्धा भाग व्यापला आहे. त्यामुळे हे खड्डे चुकविणे जिकिरीचे झाले आहे. बांधकाम विभाग वाट पाहात आहे का?बांधकाम विभागाकडून खमताणे-नवेगाव रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे. लोकांच्या जिवाशी खेळण्यात येत असून, त्यात लोकांचा जीव जाण्याची वाट बांधकाम विभाग पाहात आहे का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. हा रस्ता तातडीने दुरुस्त केला नाही तर बांधकाम विभागासमोर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा खमताणे परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे.