बागलाण शिक्षक पतसंस्थेच्या सभागृहाला खैरनार यांचे नाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:28 IST2021-09-02T04:28:47+5:302021-09-02T04:28:47+5:30
बागलाण तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झूम मीटिंगद्वारे ऑनलाइन घेण्यात ...

बागलाण शिक्षक पतसंस्थेच्या सभागृहाला खैरनार यांचे नाव
बागलाण तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झूम मीटिंगद्वारे ऑनलाइन घेण्यात आली. यावेळी सर्व सभासदांनी स्व. आर.के. खैरनार यांचे नाव सभागृहास द्यावे, अशी आग्रही भूमिक घेत भरघोस पाठिंबा दिल्याने ठराव मंजूर करण्यात आला.
खैरनार हे पंधरा वर्षे या पतसंस्थेत प्रतिनिधित्व करत होते. या कार्यकाळात त्यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती व शिक्षक संघाचे पाच वर्षांपासून जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांचे नाव या पतसंस्थेच्या सभागृहास देण्यात यावे यासाठी शिक्षक संघाने पतसंस्थेला निवेदन दिले होते. त्यामुळे ठराव मंजूर करण्यात आला.
यावेळी चेअरमन नानासाहेब पाटील, उपाध्यक्ष पुंडलिक पगार, संचालक चंद्रशेखर धाबळे, वामन खैरनार, देवराम पवार, दादा कापडणीस, संजय गुंजाळ, भाऊसाहेब सावंत, सुनील विसपुते, बबन बागूल, संगीता पवार, प्रकाश सोनवणे, शरद भामरे, भास्कर मोरे, शाखाधिकारी अनिल मगजी आदी उपस्थित होते.
(३१ नामपूर १)
बागलाण तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या वार्षिक सभेत बोलताना भाकर पाटील. शेजारी पुंडलिक पगार व संचालक.
310821\31nsk_19_31082021_13.jpg
बागलाण तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या वार्षिक सभेत बोलताना भाकर पाटील शेजारी पुंडलीक पगार व संचालक.