गारखेड्याच्या सरपंचपदी खैरनार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 16:52 IST2019-12-10T16:51:28+5:302019-12-10T16:52:22+5:30
येवला : गारखेडा येथील थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत संजय खैरनार यांनी केवळ ११ मतांनी विजय मिळविला.

गारखेड्याच्या सरपंचपदी खैरनार
सर्वसाधारण पदासाठी सरपंचपद राखीव असल्याने येथे जोरदार चुरस होती. सदस्यांच्या तीन जागा अगोदरच बिनविरोध झाल्या होत्या. प्रभाग एकमध्ये सर्वसाधारण महिला जागेवर मीराबाई खैरनार तर नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या जागेवर भीमा शंकर खैरनार हे विजयी झाले. प्रभाग दोनमध्ये सर्वसाधारण महिलेच्या जागेवर इंदूबाई खैरनार तर सर्वसाधारण जागेवर कचरू खैरनार हे विजयी झाले. प्रभाग तीनमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या महिला जागेवर मोनाली गायकवाड, अनुसूचित जातीच्या जागेवर महेश गायकवाड, तर सर्वसाधारण महिलेच्या जागेवर अलका खैरनार यांनी विजय संपादन केला. यातून सदस्यपदासाठी यापूर्वीच बिनविरोध म्हणून मोनिका गायकवाड , मीराबाई खैरनार, इंदूबाई खैरनार निवडून आल्या होत्या.