खडकवण सरपंचपदी साबळे
By Admin | Updated: August 9, 2014 00:50 IST2014-08-09T00:27:25+5:302014-08-09T00:50:46+5:30
खडकवण सरपंचपदी साबळे

खडकवण सरपंचपदी साबळे
कनाशी : कळवण तालुक्यातील खडकवण ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संजय किसन साबळे तर उपसरपंचपदी सौ. गुंताबाई अर्जुन जगताप यांची बिनविरोध निवड झाली.
ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या निवडणूक प्रक्रि येत सरपंचपदी संजय साबळे, तर उपसरपंचपदी गुंताबाई जगताप यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी डी. पी. महाले यांनी बिनविरोध निवड घोषित केली. दोन्ही अधिकाऱ्यांचा सुधाकर कामडी यांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. सत्काराला उत्तर देताना सरपंच साबळे म्हणाले की, माझ्यावर ग्रामस्थांनी विश्वास टाकला त्याला तडा जाऊ देणार नाही. गावातील अर्धवट कामे पूर्ण करून गावातील अंतर्गत रस्ते व गटारी करण्यात येतील, गावाचा विकास करण्यात येईल. यावेळी जगन पाडवी, सुधाकर कामडी, अल्का कुवर, लक्षीबाई जगताप, ग्रामसेवक आर. बी. चौधरी, शिवाजी कुवर, बबन कुवर, सुभाष सांबळे, सोनवणे व ग्रामस्थ उपस्थित होते.