शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

शाळेच्या भिंतीवर कीबोर्ड, माऊस अन् मॉनिटर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 16:43 IST

संगणक संग्रहालय : तोरंगण आश्रमशाळेत तंत्रस्नेही शिक्षकांचा उपक्रम

ठळक मुद्देघरातील व शाळेतील जुन्या संगणकातील आतील सर्व भाग मोकळे करून त्या प्रत्येक भागाला नावे देण्यात आली आहेत.

वेळुंजे : शाळा-शाळांमध्ये आता संगणक चालविण्याचे प्रशिक्षण दिले जात असले तरी या संगणकाच्या अंतरंगात नेमके काय दडले आहे, हा संगणक कसा चालतो यासाठी जुन्या विनावापर संगणकातील पार्टस् काढून त्याचे चक्क संग्रहालयच थाटत विद्यार्थ्यांना तंत्रस्नेही करण्याचा अनोखा उपक्रम त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण या गावी शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत राबविण्यात आला आहे. संगणकातील पार्टस्सह कीबोर्ड, माऊस अन् मॉनिटर यांचे शाळेच्या भिंतीवर प्रदर्शन थाटण्यात आले आहे.नाशिक जिल्ह्यातील शेवटचे टोक असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण या गावी शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील उपक्र मशील शिक्षक नितीन केवटे व ओंकार भोई यांच्या प्रयत्नातून शाळेत संगणक संग्रहालय उभे राहिले आहे. विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर डिजिटल साक्षरतेचे धडे गिरवता यावे या साठी घरातील व शाळेतील जुन्या संगणकातील आतील सर्व भाग मोकळे करून त्या प्रत्येक भागाला नावे देण्यात आली आहेत. मुले संगणक हाताळतात परंतु वर वर दिसणाऱ्या भागांचीच त्यांना माहिती असते . परंतु संगणकाच्या पोटात काय दडले आहे, त्यातील हार्डवेअरचे ज्ञान व माहिती व्हावी तसेच संगणकात किरकोळ बिघाड झाला तर तो घरच्या घरीच दुरु स्त करता यावा याशिवाय, संगणका सोबत वापरले जाणारे इतर उपकरणे देखील यांची माहिती व्हावी या उद्देशाने या संग्रहालयाची निर्मिती केली गेली आहे. नितीन केवटे यांनी अगोदर स्वखर्चाने संग्रहालय सुरू केले आहे. याशिवाय, समेंटचा किल्ला निर्मिती, चांद्रयान ची प्रतिकृती, सोलर गवत कटिंग मशीन, पडीत सिंटेक्स टाकी पासून शौचालय निर्मिती यासह विविध शैक्षणिक साहित्याची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे यातील बरेच साहित्य हे रविवारी सुट्टीच्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हस्ते रविवारचा विरंगुळा या उपक्र मा अंतर्गत तयार करण्यात आले आहे.

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळा