केसरी किताब वादाच्या आखाड्यात
By Admin | Updated: May 5, 2017 13:51 IST2017-05-05T13:51:50+5:302017-05-05T13:51:50+5:30
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेतर्फे आयोजित महाराष्ट्र केसरी व अखिल भारतीय शैली महाकुस्ती संघ आयोजित हिंद केसरी या स्पर्धांपुरताच

केसरी किताब वादाच्या आखाड्यात
नाशिक :महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने २०१४ या वर्षात अहमदनगर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या वेळी केसरी किताब हा केवळ महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेतर्फे आयोजित महाराष्ट्र केसरी व अखिल भारतीय शैली महाकुस्ती संघ आयोजित हिंद केसरी या स्पर्धांपुरताच मर्यादीत असल्याचे स्पष्ट करीत अन्य कोणत्याही खासगी व शासकीय संस्थांनी तथा गाव, तालुका व जिल्हा पातळीवरील संघटनांनी तसेच यात्रोत्सोव कुस्ती मंडळांनी ‘केसरी’ विशेषण वापरुन स्पर्धांचे आयोजन करून नये. अन्यथा महाराष्ट्र कुस्तीगीर परीषदेतर्फे कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता. यापार्श्वभूमीवर २०१५ व २०१६ या वर्षांमध्ये तालुका व जिल्हा पातळीवरील विविध संघटनांनी परिषदेच्या सूचनांचे पालन करून अशाप्रकारे केसरी विशेषणाचा वापर थांबवला आहे. मात्र चालुवर्षात महाराष्ट्र कामगार मंडळातर्फे कामगार केसरी व विदर्भ कुस्ती संघटनेने विदर्भ केसरी असा किताब जाहीर करून स्पर्धा घेत परिषदेच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप नाशिक शहर तालिम संघातर्फे करण्यात आला आहे. त्यामुळे कुस्तीगीरांच्या आखाडयात आता केसरी किताबाचा वाद निर्माण झाला आहे.
याप्रकरणी नाशिक शहर तालिम संघाने जिल्हाभरातील पहिलवान तसेच कुस्ती स्पर्धा आयोजक मंडळांना केसरी विशेषण वापरून स्पर्धा आयोजित करून नये, अशा सूचना केल्या आहेत. अनाधिकृत केसरी विशेषण असलेल्या स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या पहिलवानांना महाराष्ट्र केसरी तथा हिंद केसरी स्पर्धांसह महाष्ट्र कुस्तीगीर परिषद व अखिल भारतीय शैली महाकुस्ती संघ यांच्यातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या कोणत्याही स्पर्धांमध्ये सहभागी होता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अशा विविध स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या पहिलवानांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. याप्रकरणी कामकार आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधला असता कामगार केसरी चषकाविषयीचे नियोजन मध्यवर्ती कार्यालयातून होत असल्याचे सांगत प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न संबंधीत अधिकाऱ्यांनी दिला. मात्र कामगार मंडळाच्या या भूमिकेमुळे कामगार चषक स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या पहिलवानांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने महाराष्ट्राचा व देशाचा गौरव वाढविणारा केसरी किताब वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. (प्रतिनिधी)
खुराकासाठी अमाप खर्च
पहिलवानांना खुराकासाठी येणारा खर्च मोठ्या प्रमाणात असतो. यातील मोठा भाग स्थानिक पातळ््यांवरील कुस्ती स्पर्धांच्या बक्षीसांतून मिळणाऱ्या रक्कमेतून भागविण्याचा पहिलावानांचा प्रयत्न असतो. मात्र अशाप्रकारे स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यावर बंदणे घातली तर पहिलवानांची आर्थिक कोंडी होण्याची भीती एका नवोदीत पहिलवानाने व्यक्त केली.केसरी किताबाचीच दंगल रंगण्याचे संकेत दिसून येत आहेत.
कोणताही मल्ल यापुढे स्थानिक खोट्या केसरीसाठी खेळेत अथवा अशा किताबाचा पट्टा गळ््यात घालेन त्या पहिलावानव संबंधीत संस्थेला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व जिल्हा शहर तालिम संघाच्या कडक कारवाईचा सामना करावा लागेल. -हिरामण वाघ, अध्यक्ष, नाशिक (जिल्हा) तालिम संघ