येवल्यात उन्हाळ कांदा आवक टिकून
By Admin | Updated: June 19, 2017 00:45 IST2017-06-19T00:44:29+5:302017-06-19T00:45:09+5:30
बाजारभाव स्थीर : गव्हाची आवक घटली; तुरीला व्यापाऱ्यांची मागणी कमी

येवल्यात उन्हाळ कांदा आवक टिकून
लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : गेल्या सप्ताहात येवला व अंदरसूल मार्केट यार्डवर उन्हाळ कांद्याची आवक टिकून होती; मात्र बाजारभाव घसरल्याचे चित्र होते. कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, पश्चिम बंगाल इत्यादी राज्यांत व परदेशात दुबई, मलेशिया, कोलंबो व सिंगापूर इत्यादी ठिकाणी मागणी सर्वसाधारण होती. सप्ताहात एकूण कांदा आवक ४५५७५ क्विंटल झाली. उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान २०० ते ५०२, तर सरासरी ४७५ रुपये प्रतिक्विंटल पर्यंत होते. उपबाजार अंदरसूल येथे कांद्याची एकूण आवक १९८१९ क्विंटल झाली. उन्हाळ कांद्याचे भाव किमान २०० ते कमाल ५१०, तर सरासरी ४७५ रुपये प्रतिक्विंटल पर्यंत होते.
सप्ताहात गव्हाच्या आवकेत घट झाली, तर बाजारभाव स्थिर असल्याचे चित्र होते. गव्हास स्थानिक व्यापारी वर्गाची व देशांतर्गत मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते.
सप्ताहात गव्हाची एकुण आवक ७२ क्विंटल झाली. बाजारभाव किमान रु. १४७४ ते कमाल १७०१ तर सरासरी१५४१ रुपयांपर्यंत होते.
हरभरा : सप्ताहात हरभऱ्याच्या आवकेत घट झाली, तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. हरबऱ्यास व्यापारी वर्गाची मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात हरभऱ्याची एकूण आवक २९ क्विंटल झाली. बाजारभाव किमान ३६५३, कमाल ६०००, तर सरासरी ४९८९ रुपयांपर्यंत होते. सप्ताहात तुरीच्या आवकेत घट झाली. तुरीस व्यापारी वर्गाची मागणी कमी राहिल्याने बाजारभावात घसरण झाली.
सप्ताहात तुरीची एकुण आवक १६ क्विंटल झाली . बाजारभाव किमान . २८०० कमाल ३४२२ तर सरासरी ३२५० पर्यंत होते.
सप्ताहात सोयाबीनच्या आवकेत वाढ झाली. बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. सोयाबीनला व्यापारी वर्गाची मागणी सर्वसाधारण असल्यामुळे बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात सोयाबीनची एकुण आवक ३६ क्विंटल झाली . बाजारभाव किमान २४०० कमाल २६९१ तर सरासरी २६४२ पर्यंत होते.