नटसम्राट हा सांस्कृतिक ठेवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 01:17 AM2020-12-24T01:17:36+5:302020-12-24T01:18:08+5:30

नटसम्राट हे अजरामर नाटक सांस्कृतिक ठेवा असून, आजच्या सुवर्ण महोत्सवी दिवशीदेखील त्याचे गारूड रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे आहे. या नाटकाला मिळणारा प्रतिसाद हे रंगभूमी जिवंत असल्याचे लक्षण असल्याचे मत ज्येष्ठ रंगकर्मी उपेंद्र दाते यांनी व्यक्त केले.

Keep the nut emperor cultural! | नटसम्राट हा सांस्कृतिक ठेवा!

कुसुमाग्रज मराठी विचार मंचच्यावतीने आयोजित नटसम्राट स्वगत स्पर्धेतील विजेत्यांसमवेत ज्येष्ठ रंगकर्मी उपेंद्र दाते. समवेत स्वप्नील तोरणे, सतीश बोरा, सुभाष सबनीस, उपेंद्र दाते, आनंद देशपांडे, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार आदी.

googlenewsNext
ठळक मुद्देउपेंद्र दाते: कुसुमाग्रज विचार मंचच्या स्वगत स्पर्धेचे पारितोषिक

नाशिक- नटसम्राट हे अजरामर नाटक सांस्कृतिक ठेवा असून, आजच्या सुवर्ण महोत्सवी दिवशीदेखील त्याचे गारूड रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे आहे. या नाटकाला मिळणारा प्रतिसाद हे रंगभूमी जिवंत असल्याचे लक्षण असल्याचे मत ज्येष्ठ रंगकर्मी उपेंद्र दाते यांनी व्यक्त केले.

कुसुमाग्रज मराठी विचार मंचतर्फे नटसम्राटच्या पहिल्या प्रयोगाच्या सुवर्ण महोत्सवी दिनानिमित्त आयोजित स्वगत स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ बुधवारी (दि.२३) कालिदास कलामंदिर येथे संपन्न झाला. त्यावेळी ते बेालत होते. यावेळी व्यासपीठावर मंचचे अध्यक्ष सतीश बोरा, उपाध्यक्ष आनंद देशपांडे, सरचिटणीस दिलीप बारावकर, सुभाष सबनीस, श्याम पाडेकर, श्रीधर व्यवहारे, डॉ. स्वप्नील तोरणे, मिलिंद कुलकर्णी, मुक्तेश्वर मुंशेट्टिवार, श्रीमती वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

नटसम्राटमध्ये भूमिका करायची स्वप्ने प्रत्येक कलाकार बघत असतो. मोहिनी घालणारे हे नाटक वाचकांवर, प्रेक्षकांवर संस्कार करीत आहे. गेल्या पन्नास वर्षांपासून या नाटकाला सातत्याने गर्दी होत असते, असे सांगून दाते यांनी काही कारणाने रंगभूमीला ब्रेक बसला असला तरी आता पुन्हा नाटके सुरू झाल्याने रंगभूमीला सोन्याचे दिवस येतील, असेही ते म्हणाले. यावेळी स्पर्धेतील पारितोषिक विजेते युगा मिलिंद कुलकर्णी, गार्गी ब्राह्मणकर,वेदिका पंचभाई, तुकाराम नाईक आणि नटसम्राट उपेंद्र दाते यांनी नटसम्राटमधील स्वगतांचे सादरीकरण केले.

सतीश बोरा यांनी नव्या पिढीला तात्यासाहेबांनी दिलेले प्रेरणादायी विचार पोहोचवण्यासाठी मंचची स्थापना करण्यात आली असल्याचे सांगितले. स्पर्धेचे संयोजक श्याम पाडेकर, विनोद दासरी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. तर आनंद देशपांडे यांनी आभार मानले.

 

Web Title: Keep the nut emperor cultural!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.