कचऱ्याचे नियोजन करून परिसर स्वच्छ ठेवा

By Admin | Updated: February 9, 2016 22:49 IST2016-02-09T22:48:03+5:302016-02-09T22:49:25+5:30

निमोण : उपायुक्त मित्रगोत्री यांचे आवाहन

Keep the area clean by planning the trash | कचऱ्याचे नियोजन करून परिसर स्वच्छ ठेवा

कचऱ्याचे नियोजन करून परिसर स्वच्छ ठेवा

दरेगाव : घनकचऱ्यांचे योग्य नियोजन करुन गाव स्वच्छ ठेवा असे प्रतिपादन नाशिक विभागीय सहाय्यक उपायुक्त मित्रगोत्री यांनी केले. चांदवड तालुक्यातील निमोण गावास भेट देऊ न ग्रामपंचायतीने केलेल्या विविध कामांची त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी निमोण ग्रामपंचायतीने साकारलेली भूमिगत गटारीसह अन्य कामांची पाहणी केली. स्वच्छ गाव सुंदर गाव संकल्पनेनुसार निमोण गावाची सुरू असलेली वाटचाल बघून त्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी मित्रगोत्री यांनी कचऱ्यासह सांडपाण्याचे नियोजन होणे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते, ग्रामपंचायतीने भूमिगत गटारी साकारून सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावली आहे. नागरिकांनी कुठेही सांडपाणी न साठवता भूमिगत नाल्याचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी ग्रामस्थांना केले. यावळी निमोणचे उपसरपंच प्रवीण बोडके यांनी मित्रगोत्री यांचा सत्कार केला. या पाहणीदौऱ्यात चांदवडचे गटविकास अधिकारी भूपेंद्र बेडसे, सरपंच डॉ. स्वाती देवरे, सदस्य पंकज दखणे, ग्रामसेवक श्रीमती
सी.डी. ठाकरे, वंदना दखणे, सुरेखा पिंपळे, सोसायटीचे सभापती कांतीलाल निकम, पोलीसपाटील हिरामण देवरे, डॉ.भावराव देवरे, भाऊसाहेब गोसावी, ग्रामस्थ उपस्थित होते. ( वार्ताहर)

Web Title: Keep the area clean by planning the trash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.