‘केबीसी’तील संशयित महिलांना कोठडी

By Admin | Updated: July 24, 2014 01:04 IST2014-07-24T00:10:22+5:302014-07-24T01:04:08+5:30

‘केबीसी’तील संशयित महिलांना कोठडी

'KBC' suspected women have been arrested | ‘केबीसी’तील संशयित महिलांना कोठडी

‘केबीसी’तील संशयित महिलांना कोठडी

नाशिक : केबीसी कंपनीने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आडगाव पोलिसांनी अटक केलेल्या कौशल्या जगताप व भारती शिलेदार या दोघींनाही अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩ यू़ कापडी यांनी बुधवारी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे़
केबीसी फसवणूक प्रकरणात आडगाव पोलिसांनी १९ जुलैला पोलीस कर्मचारी संजय जगतापची पत्नी कौशल्या जगताप व भाऊसाहेब चव्हाणची मेहुणी भारती शिलेदार यांना अटक केली होती़ त्यांना न्यायालयाने २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती़ या दोघींचीही पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना आज न्यायालयात हजर केले असता त्यांची रवानगी नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली़
केबीसी मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालकांनी गुंतवणूकदारांच्या केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणाचा तपास शहर आर्थिक गुन्हे शाखेकडे नुकताच वर्ग करण्यात आला आहे़ यासाठी आठ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या एका विशेष पथकाचीही निर्मिती करण्यात आली़ मंगळवारपर्यंत ५५५८ तक्रारदारांनी तक्रारी केल्या असून, फसवणुकीची एकूण रक्कम १४८ कोटी ७९ लाख ४ हजार ३०० रुपयांवर जाऊन पोहोचली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: 'KBC' suspected women have been arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.