केबीसी संचालकांना बेड्या घाला : माळी
By Admin | Updated: July 26, 2014 00:52 IST2014-07-25T22:23:30+5:302014-07-26T00:52:21+5:30
उपमुख्यमंत्र्यांना साकडे

केबीसी संचालकांना बेड्या घाला : माळी
नाशिक : राज्यभरातील नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या केबीसी संचालकांना तत्काळ अटक करावी व गुंतवणूकदारांचे अडकलेले पैसे परत करावेत, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या सभापती ज्योती बाळासाहेब माळी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निर्धार मेळाव्यासाठी नाशिकला आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ज्योती माळी व बाळासाहेब माळी यांनी भेट घेऊन त्यांना केबीसीसंदर्भात निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, नाशिक येथील केबीसी कंपनीत वडनेरभैरव येथील शेकडो नागरिकांनी कोट्यवधींची गुंतवणूक केली.
आज त्यांच्यावर आत्महत्त्या करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे केबीसी संचालकांना तत्काळ अटक करून केबीसी कंपनीतील गुंतवणूकदारांना त्यांनी गुंतवलेली रक्कम परत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)