केबीसी ठेवीदारांचा मंगळवारी हिंगोलीला महामेळावा
By Admin | Updated: November 8, 2014 23:52 IST2014-11-08T23:47:39+5:302014-11-08T23:52:40+5:30
केबीसी ठेवीदारांचा मंगळवारी हिंगोलीला महामेळावा

केबीसी ठेवीदारांचा मंगळवारी हिंगोलीला महामेळावा
नाशिक : गुंतवणुकीवर तिप्पट रकमेचे आमिष दाखवून जनसामान्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारा केबीसीचा प्रमुख संचालक भाऊसाहेब चव्हाण व त्याची पत्नी आरती चव्हाण यांना सिंगापूरहून त्वरित भारतात आणावे़ चव्हाण कुटुंबीयांची संपत्ती जप्त करून ती गुंतवणूक केलेल्या ठेवीदारांना परत द्यावी या मागणीसाठी केबीसी ठेवीदार बचाव संघर्ष कृती समितीतर्फे मंगळवारी (दि़११) रोजी हिंगोली येथे महामेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष करण गायकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली़ केबीसीचा प्रमुख संचालक असलेले चव्हाण दांपत्य सिंगापूर येथे पळून गेले असून, न्यायालयाने त्यांना स्टँडिंग अटक वॉरंटही काढले आहेत़ या दोघांनाही भारतात आणण्यासाठी राज्य सरकारने पाऊले उचलावीत़ शारदा चिटफंड घोटाळ्याच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने केबीसी गुंतवणूकदारांचे पुनर्वसन करावे़ गुंतवणूकदारांना जोपर्यंत त्यांची संपूर्ण रक्कम मिळत नाही तोपर्यंत अटक केलेल्या संशयिताना जामीन देऊ नये़ संचालकांच्या सर्व मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव करून गुंतवणूकदारांची रक्कम लवकरात लवकर परत करावी, अशा मागण्यांचे ठराव या मेळाव्यात केले जाणार आहेत़