काझी गढी ढासळली; तीन पूल पाण्याखाली

By Admin | Updated: July 31, 2014 00:54 IST2014-07-31T00:29:38+5:302014-07-31T00:54:24+5:30

संततधार : रहिवाशांच्या स्थलांतराची तयारी; जनजीवन झाले विस्कळीत

Kazi fort collapses; Three pools under water | काझी गढी ढासळली; तीन पूल पाण्याखाली

काझी गढी ढासळली; तीन पूल पाण्याखाली

लातूर : आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज पेटला आहे़ आरक्षणाच्या मागणीसाठी मुरुडमध्ये तर देवणीमध्ये धनगर समाजाने आपल्या शेळ्या-मेंढ्यासह तहसीलवर मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले़
मुरूड : धनगर समाज आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने धनगर समाजाच्या एस़टी़आरक्षणाच्या मागणीसाठी मंगळवारी मुरूडमधील लातूर-बार्शीरोडवर रास्ता रोको करण्यात आला़ धनगर समाज आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने एकत्र येवून समाजबांधवांची अहिल्याबाई होळकर चौकातून रॅली काढण्यात आली़ ही रॅली डॉ़बाबासाहेब आंबेडकर चौकातून छत्रपती राजर्षी शाहू महाराज चौकातून बसस्थानक परिसरात आल्यानंतर आरक्षणाच्या घोषणा देवून आरक्षणाच्या मागणीसाठी रास्ता रोको करण्यात आला़ ६५ वर्षापासून सुरू असलेल्या मागणीला रास्ता रोका आंदोलनाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला़ या आरक्षणाला आदीवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड हे विरोध करीत असल्याने आंदोलनाच्या वेळी पदाधिकाऱ्यांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला़
यावेळी प्रा़विष्णू गोरे, बल्लु महाराज, लक्ष्मीकांत तवले, राजाभाऊ सोनटक्के, फुलचंद हिंगले, बळी हिंगले, दादा हिंगले, मधुकर नायगावकर, गहिनाथ गावडे, कपिल पाटील, जगन्नाथ पडवडे, भजनदास बर्डे, बालाजी पाटील, हनुमंत खांडेकर, तुकाराम पाटील, गोविंद वाघे, जयराम हजारे, राम हजारे, येमेश हिंगले, अ‍ॅड़उल्हास बनसोडे, शहाजी बन्डे, नारायण भालेकर, मोहन बनसोडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते़
देवणी : देवणी येथील धनगर समाजातर्फे त्यांच्या विविध मागण्यासाठी शेळ्या-मेंढ्यासह तहसील कार्यालयावर आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले़
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा, सदरील जातीचा संवर्गाचे प्रमाणपत्र देण्यात यावे़ या मागण्यासाठी तहसीलवर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले़ या निवेदनावर दादाराव तपसाळे, किशन कल्याणकर, नागप्पा कल्याणकर, पुंडलीक तपसाळे, विश्वनाथ म्हेत्रे, तातेराव सोनाळे, डिगंबर मिर्झापूरे, दत्ता कल्याणकर, गुणवंत कल्याणकर, धनराज मिर्झापूरे, महेश डोणगापूरे, सुनील रावणगावे, काशिनाथ सोनाळे, विश्वनाथ कल्याणकर, चंद्रकांत तपसाळे, गोविंद म्हेत्रे, रेवण कल्याणकर शेळ्या-मेंढ्यासह धनगर समाजबांधव उपस्थित होते़ (वार्ताहर)

Web Title: Kazi fort collapses; Three pools under water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.