रविवारी केवडीबन म्हसोबा महराज यात्रा

By Admin | Updated: May 24, 2014 00:24 IST2014-05-24T00:20:25+5:302014-05-24T00:24:30+5:30

पंचवटी : केवडीबन येथिल श्री म्हसोबा महाराज मंदीरात येत्या रविवारी श्री म्हसोबा महाराज बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे म्हसोबा महाराज यात्रोत्सवाचे आयोजन केले आहे. या यात्रोत्सवानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहे.

Kavdiban Mahasoba Maharaj Yatra on Sunday | रविवारी केवडीबन म्हसोबा महराज यात्रा

रविवारी केवडीबन म्हसोबा महराज यात्रा

पंचवटी : केवडीबन येथिल श्री म्हसोबा महाराज मंदीरात येत्या रविवारी श्री म्हसोबा महाराज बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे म्हसोबा महाराज यात्रोत्सवाचे आयोजन केले आहे. या यात्रोत्सवानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहे.
रविवारी सकाळी सात वाजता या यात्रोत्सवाला प्रारंभ करण्यात येणार आहे. सकाळी आठ ते दहा यावेळेत श्रींची महापूजा व सत्यनारायण पूजन होईल. त्यानंतर दहा वाजता श्रींची परिसरातून सवाद्य मिरवणूक काढली जाईल. सकाळी अकरा ते सायंकाळी सहा यावेळेत पारंपारिक बोहाडयाचा कार्यक्रम होईल. दुपारी भाविकांना महाप्रसाद वाटप, अन्नदान, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला माधवगिरी महाराज, सागरानंद सरस्वती, स्वामी संविदानंद सरस्वती, संत माऊली महाराज, महंत नरसिंहदास, सिताराम बाबा, संतोषगिरी महाराज, श्रवणगिरी महाराज, महंत त्र्यंबकदास महाराज, तसेच विविध आखाडयांचे साधू महंत उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला आमदार जयंत जाधव, हेमंत शे˜ी, माजी महापौर बाळासाहेब सानप, ज्योति गांगुर्डे, अर्जुन गांगुर्डे, नगरसेवक समाधान जाधव, आदिंसह मान्यवर उपस्थित राहणार असुन भाविकांनी यात्रोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष देवकिसन पारिख, रमेश कवरे, दत्तात्रय लिलके, कैलास क्षिरसागर, नंदू पवार, आदिंसह श्री म्हसोब महाराज बहुउद्देशीय मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे. (वार्ताहर)

Web Title: Kavdiban Mahasoba Maharaj Yatra on Sunday