नाशिक : जम्मू-काश्मीर येथील बालिकेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी संशियतांना कठोर शिक्षा द्यावी, तसेच उन्नाव येथील अत्याचार प्रकरणातील आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी या मागण्यांसाठी सोमवारी (दि.१६) शहरातील नागिरकांनी ‘आम्ही नाशिककर’ या संकल्पनेअंतर्गत एकत्र येत रस्त्यावर उतरून सर्वपक्षीय मोर्चा काढला. पीडित बालिकांना न्याय द्या, नराधमांना शिक्षा द्या,अशी मागणी करीत शहरातील शहीद भगतसिंग चौक ते मेनरोडवरील गाडगेमहाराज पुतळ्यापर्यंत देशातील अत्याचाराच्या घटनांचा निषेधार्थ रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांनी केंद्र सरकार व राज्य सरकार विरोधात तीव्र आक्रोश केला. ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘चारो तरफ पाबंदी हंै, ये कैसी आझादी हंै’ या घोषणांसोबतच भाजपा विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. कथुआ व उन्नाव प्रकरणातील आरोपींना भाजपा सरकार पाठीशी घालीत असल्याचा आरोप करीत सरकारविरोधातही घोषणाबाजी केली. देशात बालिकांवर झालेल्या अत्याचाराच्या घटना माणुसकीला काळिमा फासणाऱ्या असून, अशाप्रकारे अत्याचार करणाºया नराधमांना सरकार पाठीशी घालीत असताना पीडितांना कोण न्याय मिळवून देणार, असा सवाल आंदोलकांनी केला आहे. यावेळी मोर्चात सहभागी आंदोलकांनी अत्याचाराच्या घटनांमधील आरोपी उजळ माथ्याने फिरत असताना सर्वसामान्यांवर वेगवेगळे निर्बंध लादले जात आहेत. त्यामुळे खरंच आपण स्वतंत्र भारतात राहतो का? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला. द्वारका परिसरातील शहिद भगतसिंग चौकातून निघालेला हा मोर्चा महालक्ष्मी चाळ, बागवानपुरा, आझाद चौक, चौव्हाटा, बडी दर्गा, शहीद अब्दुल हमीद चौक, भद्रकाली मार्केटमार्गे गाडगे महाराज पुतळ्यासमोर मेणबत्या पेटवून मोर्चाचा समारोप करण्यात आला. यावेळी मोर्चात नगरसेवक हेमलता पाटील, राजू देसले, नितीन भुजबळ, मोहन बोडके, करुणासागर पगारे, निशिकांत पगारे, मनोहर अहिरे, अनिता पगारे, महादेव खुडे, राकेश पवार, श्यामला चव्हाण, समाधान भारतीय आदींनी सह सर्व जातीधर्मांच्या महिला पुरुषांसह सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते काळ्याफिती लावून व काळा पोषाख परिधान करून सहभागी झाले होते.जलद न्यायाची मागणीमहिलांवर होणाया अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या सर्व घटनांतील आरोपींना कोठार शिक्षा करून पीडित महिला व मुलींना जलद न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी नाशिकरांनी मोर्चा काढला. या मोर्चातून सरकारला महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर जाब विचारण्यात आला. या प्रकरणी मंगळवारी जिल्हाधिकाºयांना महिलांच्या मागण्यांचे निवेदन देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.‘इन्कलाब जिंदाबाद’च्या घोषणा४‘आम्ही नाशिककर’ या संकल्पनेतून एकत्र आलेल्या नाशिककरांच्या मोर्चात तारांचद मोतुमल व योगश कापसे यांनी ‘सूर्याचे किरण हाती, उजेडाची ही नाती, काळोखाची काय बिशाद, इन्क लाब जिंदाबाद’ हे गीत सादर करीत देशातील कोणत्याही घटनांचा सामना करण्यास तरुणाई सज्ज असल्याचा इशारा दिला. त्याचप्रमाणे ‘हे स्वातंत्र्य आहे फसवे, काळ्या आईच्या डोळ्यात आसवं, तिच्या लेकाला घालुया साद, इंकलाब जिंदाबाद या ओळींच्या माध्यमातून देशातील शेतकºयांनीच दुरवस्थाही मांडण्याचा प्रयत्न केला.मुलींनी केले नेतृत्वकथुआ, उन्नाव येथील अत्याचाराच्या घटनांचा निषेध नोंदविण्यासाठी नाशिककरांनी काढलेल्या मोर्चाचे नेतृत्व लहान मुलींनी केले. मोर्चाच्या प्रारंभी लहान मुलींनी व महिलांनी पेटत्या मशाली घेऊन मोर्चात सहभागी झाल्या होत्या. पीडितांना न्याय मिळवून देण्याची मागणी आंदोलण करत्यांनी केली.
कथुआ, उन्नाव अत्याचाराविरोधात नाशिककर रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 01:36 IST
जम्मू-काश्मीर येथील बालिकेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी संशियतांना कठोर शिक्षा द्यावी, तसेच उन्नाव येथील अत्याचार प्रकरणातील आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी या मागण्यांसाठी सोमवारी (दि.१६) शहरातील नागिरकांनी ‘आम्ही नाशिककर’ या संकल्पनेअंतर्गत एकत्र येत रस्त्यावर उतरून सर्वपक्षीय मोर्चा काढला.
कथुआ, उन्नाव अत्याचाराविरोधात नाशिककर रस्त्यावर
ठळक मुद्दे पीडित महिला व मुलींना जलद न्याय मिळवून देण्याची मागणी पीडित बालिकांना न्याय द्या, नराधमांना शिक्षा द्या,आरोपींना भाजपा सरकार पाठीशी घालीत असल्याचा आरोप