दुर्गापूजा महोत्सवात कथ्थक नृत्याची रंगत

By Admin | Updated: October 21, 2015 22:16 IST2015-10-21T22:16:23+5:302015-10-21T22:16:59+5:30

राणेनगर : नाशिकरोडच्या नृत्याली भरतनाट्यम संस्थेच्या विद्यार्थ्यांचा नृत्याविष्कार

Kathak dance drama in Durgapuja festival | दुर्गापूजा महोत्सवात कथ्थक नृत्याची रंगत

दुर्गापूजा महोत्सवात कथ्थक नृत्याची रंगत

नाशिकरोड : सिडको येथील राणेनगरमध्ये टागोरनगर कल्चरल अ‍ॅँड सोशल असोसिएशनतर्फे दुर्गापूजा महोत्सवात नृत्याली भरतनाट्यम संस्थेच्या विद्यार्थिनींनी भरतनाट्यम नृत्य सादर करून उपस्थिताना खिळवून ठेवले होते.
टागोरनगर कल्चरल असोसिएशनच्या वतीने राणेनगर जाजू हायस्कूल शेजारील समाजमंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त देवीची स्थापना करण्यात आली आहे. यानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये नृत्याली भरतनाट्यम संस्थेच्या संचालिका सोनाली करंदीकर व त्यांच्या शिष्यांनी देवीच्या विविध अवतारांवर चंद्रघटा, माता कालिका अशी देवींची भरतनाट्यममधून एक एक रूप उलगडून दाखविले.
तसेच महिषासूर मर्दिनी, नारायणी नमोस्तुते सारख्या रचनांनी देवीची सौम्य, सुंदर, मनमोहक रूप तर चंद्रघटा, कालिका, चंडीका, दुर्गा अशा उग्र रूपाचे वर्णन करणाऱ्या रचनांना उपस्थितांकडून विशेष दाद मिळाली. प्रिया करंदीकर यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.
टागोरनगर असोसिएशनचे मृदुल देब यांच्या हस्ते नृत्याली भरतनाट्यम संस्थेच्या संस्थापिका सोनाली करंदीकर व सहकलाकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Kathak dance drama in Durgapuja festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.