‘क्रेडाई’ राज्य अध्यक्षपदी कटारिया

By Admin | Updated: March 21, 2017 03:15 IST2017-03-21T03:15:33+5:302017-03-21T03:15:33+5:30

‘क्रेडाई महाराष्ट्र’च्या राज्य अध्यक्षपदी पुण्याचे शांतीलाल कटारिया यांची पुढील दोन वर्षांसाठी बिनविरोध निवड करण्यात आली.

Kataria as president of 'CREDAI' | ‘क्रेडाई’ राज्य अध्यक्षपदी कटारिया

‘क्रेडाई’ राज्य अध्यक्षपदी कटारिया

नाशिक : ‘क्रेडाई महाराष्ट्र’च्या राज्य अध्यक्षपदी पुण्याचे शांतीलाल कटारिया यांची पुढील दोन वर्षांसाठी बिनविरोध निवड करण्यात आली. संघटनेची नूतन कार्यकारिणीही जाहीर केली गेली. मावळते अध्यक्ष प्रशांत सरोदे यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक सभा झाली. राजीव पारीख (कोल्हापूर), प्रमोद खैरनार पाटील (औरंगाबाद), महेश साधवानी (नागपूर), रसिक चौव्हाण (नवी मुंबई) यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. नाशिकचे सुनील कोतवाल यांची मानद सचिवपदी तर पुण्याच्या अनुज भंडारी यांची खजिनदारपदी नेमणूक केली. (प्रतिनिधी)

Web Title: Kataria as president of 'CREDAI'