चास येथे काशाईदेवी शारदीय नवरात्रोत्सव
By Admin | Updated: October 12, 2015 23:41 IST2015-10-12T23:41:47+5:302015-10-12T23:41:47+5:30
चास येथे काशाईदेवी शारदीय नवरात्रोत्सव

चास येथे काशाईदेवी शारदीय नवरात्रोत्सव
सिन्नर : चास येथे काशाई देवी शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
काशिकानंद महाराजांच्या आशीर्वादाने व ग्रामस्थांच्या पुढाकारातून अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण तथा भागवत कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज पहाटे काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, भागवत कथा, गाथा भजन, सामुदायिक हरिपाठ, प्रवचन व कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. या धार्मिक कार्यक्रमात तुकाराम महाराज वेलजाळी, प्रमोद महाराज भालेराव, बाळनाथ महाराज भागवत, पुजाताई सांगळे, आण्णासाहेब सोनवणे, रामदास महाराज जगदाळे यांचे प्रवचन होणार आहे. तर प्रांजलताई चव्हाण(पुणे), शीतलताई साबळे (राहुरी), ज्ञानेश्वरी बागूल (आळंदी), राधाताई सानप (बीड), गीताबाई हगवणे (घोरवड), सकुताई म्हस्के (कन्नड), आश्विनीताई म्हात्रे (डोंबिवली), गीतांजली झेंडे (पुणे), शारदाताई सूर्यवंशी (नाशिक) यांचे कीर्तन होणार आहे. गुरुवारी (दि. २१) सकाळी शारदाताई सूर्यवंशी यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. नवरात्रौत्सवानिमित्त येथील काशाई देवी मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. (वार्ताहर)