मजूर संघावर कासव विजयी

By Admin | Updated: March 8, 2016 00:23 IST2016-03-07T22:49:13+5:302016-03-08T00:23:41+5:30

चांदवड : शिरीश कोतवाल गटाचे वर्चस्व

Kasav won the labor union | मजूर संघावर कासव विजयी

मजूर संघावर कासव विजयी

चांदवड : जिल्हा मजूर सहकारी संघासाठी रविवारी (दि. ६) मतदान प्रक्रिया झाली या निवडणुकीत चांदवड तालुका संचालकपदी माजी आमदार शिरीश कोतवाल यांच्या गटाचे शिवाजी कासव यांना ३२ मते, तर विद्यमान आमदार डॉ. राहुल अहेर, डॉ. आत्माराम कुंभार्र्डे यांच्या नेतृत्वाखालील गटातील तालुक्यातील शरद अहेर (भाजपा- शिवसेनेचे उमेदवार) यांना २७ मते मिळाली. एक मत बाद झाले. शिवाजी कासव यांची निवड जाहीर होताच शहर व आहिरखेडे येथे आतषबाजी करीत मजूर संघाच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
आतापावेतो गेली अनेक
वर्षं माजी आमदार शिरीश कोतवाल यांच्या गटाकडे तालुका संचालकपद होते. असा पूर्वइतिहास आहे. या निवडणुकीसाठी तालुक्यातील
६० मतदार होेते. त्यापैकी ३२
मते कासव यांना, तर २७ मते शरद अहेर यांना मिळाली. मात्र कॉँग्रेसच्या व कोेतवाल निष्ठावान कार्यकर्ते शिवाजी कासव यांची मजूर संघाच्या संचालकपदी वर्णी लागल्याची चर्चा तालुक्यात आहे.
नाशिक जिल्हा मजूर संघाच्या गेल्या निवडणुकीच्या वेळी वडार समाजाचे नेते म्हसू रामा कापसे हे माजी आमदार कोतवाल गटाकडून बिनविरोध निवडून आले होते.यावेळी ही निवडणूक बिनविरोध होईल, अशी अपेक्षा असताना ऐनवेळी बोलणी फिसकटल्याने निवडणुकीची प्रक्रिया राबविण्यात आली.
शिवाजी कासव यांच्याकडे
३५ ते ४० मते असल्याचा दावा
ते पूर्वीपासून करीत होते, तर भीमराव जेजुरे हे कॉँग्रेसचे निष्ठावान
असल्याने त्यांची मते निर्णायक ठरल्याचे बोलले जात आहे.
शिवाजी कासव यांच्या निवडीसाठी माजी आमदार कोतवाल, माजी आमदार उत्तम भालेराव, शंकरराव गांगुर्डे, खंडेराव अहेर, संजय जाधव व त्यांच्या मित्रमंडळीनी व कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मदत केल्यानेच शिवाजी कासव यांचा विजय निश्चित झाला आहे, असे बोलले जात आहे.
दरम्यान, विद्यमान आमदारांचे तालुक्यातील काम बघता आपल्या मजूर संस्थेला काही ठेके मिळावी, या लाभापोटी मतदार त्यांच्या मागे जातील, असा अंदाज होता; मात्र पूर्वी केलेल्या कामांचे मूल्यमापन म्हणून मजूर संस्थेचे शिवाजी कासव यांना मतदान केल्याने विद्यमान आमदारांना एक प्रकारे धक्काच दिल्याची चर्चा तालुक्यात आहे. (वार्ताहर)
दिंडोरी रस्त्यावरील अमझिरा श्री शंखेश्वर महातीर्थावर महोत्सव
वणी : वणी- दिंडोरी रस्त्यावरील अमझिरा श्री शंखेश्वर महातीर्थावर त्रयाहिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती विश्वस्त जयंतीलाल समदडिया यांनी दिली.
दि.१९ ते २१मार्च या तीनदिवसीय उत्सवात कुंभ स्थापना, दीपक स्थापना, ज्वारारोपण, नवग्रहादी पाटलापूजन, अभिषेक, सतरभेदी पूजा, रचनासह अष्टप्रकारी ध्वजारोहण आदि कार्यक्रम होणार आहेत. महाराष्ट्राबरोबर परराज्यातील जैन बांधव महोत्सवाला हजेरी लावतात. महोत्सवास उपस्थित राहावे, असे आवाहन श्री संभवनाथ जैन श्वेतांबर मूर्तिपूजक तपागच्छ संघ व विश्वस्त मंडळाने केले आहे. (वार्ताहर)

Web Title: Kasav won the labor union

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.