करंजगाव, म्हाळसाकोरेला कडकडीत बंद
By Admin | Updated: June 2, 2017 00:37 IST2017-06-02T00:34:02+5:302017-06-02T00:37:09+5:30
चांदोरी : नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील चांदोरी गावाने आज दिवसभर कडकडीत बंद पाळला

करंजगाव, म्हाळसाकोरेला कडकडीत बंद
चांदोरी : नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील चांदोरी गावाने आज दिवसभर कडकडीत बंद पाळला. चांदोरी, भेंडाळी, करंजगाव, म्हाळसाकोरे, शिंगवे या गावांत दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला. शेतकऱ्यांनी जरी संप पुकारला असला तरी शेतकऱ्यांसोबत गावातील, महामार्गावरील सर्व दुकाने दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवले. शेती तोट्यात असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतीवर आधारित व्यवसायदेखील अडचणीत आले आहेत. शेतकरी आणि ग्रामीण भागातील व्यावसायिक यांचे नाते एकमेकांशी निगडित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी दुकानदारांनी दुकाने बंद ठेवून बंद पाळला. ग्रामस्थांनी दिवसभर गावात एका ठिकाणी ठिय्या मांडला होता.