कपिलधारा तीर्थक्षेत्र शाहीस्नानासाठी सज्ज
By Admin | Updated: September 5, 2015 22:13 IST2015-09-05T22:11:32+5:302015-09-05T22:13:13+5:30
तीनही आखाड्यांची प्रमुख उपस्थिती : भाविकांसाठी पार्किंगची सोय

कपिलधारा तीर्थक्षेत्र शाहीस्नानासाठी सज्ज
घोटी : इगतपुरी तालुक्यातील सिंहस्थाचे मूळ स्थान असलेल्या श्री तीर्थक्षेत्र कपिलधारा कावनईचे शाहीस्नान रविवारी (दि.६) सकाळी दहा वाजता होणार असल्याची माहिती कावनईचे महंत महंत फलाहारी महाराज यांनी दिली. जगद्गुरु रामानंदचार्य आखाडा परिषद आणि तीनही आनी आखाड्यांच्या प्रमुख उपस्थित हे शाहीस्नान होणार असून, यावेळी प्रमुख महंत म्हणून आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज, जगद्गुरु रामानंदचार्य नरेंद्र महाराज हे उपस्थित राहणार आहेत.
या पर्वणी शाहीस्नानासाठी प्रशासन सज्ज झाले असून, भाविकांसाठी पार्किंगची सोय करण्यात आली आहे. पर्वणीस जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज, जगद्गुरू रामानंदाचार्य श्री हंसदेवचार्यजी महाराज, आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज, महंत माधवचार्यजी महाराज, अखिल भारतीय श्री पंच दिगंबर अनी आखाड्याचे महंत क्रि ष्णदासजी महाराज, तसेच महंत रामकिशोरदासजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत व पालकमंत्री गिरीश महाजन, सहकारमंत्री दादा भुसे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री बबन घोलप, गुलाब पाटील, उल्हासदादा पवार, खासदार हेमंत गोडसे, हरिश्चंद्र चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंभळे, आमदार निर्मला गावित, देवयानी फरांदे, योगेश घोलप, सीमा हिरे, राजाभाऊ वाजे, बाळासाहेब सानप आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून, आज कपिलधारा तीर्थ परिसराच्या कामाची आणि संभाव्य गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाचा आढावा जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह व जिल्हा पोलीस प्रमुख संजय मोहिते यांनी घेतला. त्यांनी तीर्थक्षेत्राची पाहणी करून आवश्यक त्या सूचना केल्या. यावेळी प्रांताधिकारी बाळासाहेब वाघचौरे, उपअधीक्षक प्रशांत मोहिते, उपविभागीय अधीक्षक छगण देवराज, तहसीलदार महेंद्र पवार आदिंनी महंत रामनारायणदास फलाहारी महाराज, कुलदीप चौधरी, पोपट टाटिया, मगन पटेल, सोमनाथ सूर्यवंशी आदिंशी चर्चा केली.