शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
3
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
4
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
5
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
7
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
10
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
11
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
12
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
13
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
14
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
15
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
16
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
17
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
19
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
20
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप

कपालेश्वर मंदिर तीन दिवस भाविकांसाठी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 10:37 PM

पंचवटी : आगामी आठवड्यात महाशिवरात्री उत्सव असल्याने गंगाघाटावरील श्रीकपालेश्वर महादेव मंदिरात हजारो शिवभक्तांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असल्याने सध्याचे कोरोना संसर्ग वातावरण लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने बुधवार (दि. १०) ते शुक्रवार (दि.१२) असे सलग तीन दिवस मंदिरात भाविकांना दर्शनासाठी मनाई केली आहे.

ठळक मुद्देमहाशिवरात्री : कोरोना रोखण्यासाठी घेतला निर्णय

पंचवटी : आगामी आठवड्यात महाशिवरात्री उत्सव असल्याने गंगाघाटावरील श्रीकपालेश्वर महादेव मंदिरात हजारो शिवभक्तांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असल्याने सध्याचे कोरोना संसर्ग वातावरण लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने बुधवार (दि. १०) ते शुक्रवार (दि.१२) असे सलग तीन दिवस मंदिरात भाविकांना दर्शनासाठी मनाई केली आहे.गंगाघाटावर कपालेश्वर मंदिर असून दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी हजारो शिवभक्त मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासून गर्दी करतात. संपूर्ण देशभरात गेल्या वर्षी कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता. संसर्ग रोखण्यासाठी शासनाने गेल्या वर्षी अनेक दिवस सर्वच मंदिरे तसेच धार्मिक स्थळ बंद ठेवली होती. काही दिवसांनी संसर्ग कमी झाल्याने शासनाने नियम व अटीशर्ती व मंदिरे उघडण्यास परवानगी दिली. मंदिरे खुली होताच शेकडो भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी पूर्वीप्रमाणे गर्दी केली असल्याचे चित्र दिसून येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरात पुन्हा रुग्ण वाढल्याने तसेच गर्दीच्या ठिकाणी संसर्ग वाढण्याची दाट शक्यता असल्याने प्रशासनाने खबरदारी म्हणून सलग तीन दिवस भाविकांना मंदिरात दर्शनासाठी मनाई केली आहे. त्यानुसार बुधवार, गुरुवार व शुक्रवार हे तीन दिवस कपालेश्वर मंदिर खुले असले तरी भाविकांना मुख्य मंदिरात दर्शनासाठी जाता येणार नाही.गुरुवारी महाशिवरात्रीला मंदिरातील मोजक्या पुजारी, गुरव वर्गाच्या उपस्थितीत कोरोना नियम पालन करून विविध धार्मिक कार्यक्रम पार पाडावे, अशा सूचना पंचवटी पोलीस ठाण्यातर्फे लेखी स्वरूपात देण्यात आल्या आहेत. महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची कपालेश्वर मंदिरात गर्दी होऊन संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने मंदिरात भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी कपालेश्वर मंदिर विश्वस्त गुरव तसेच पुजाऱ्यांची बैठक घेऊन पोलीस प्रशासन सूचना करणार आहे.

टॅग्स :Templeमंदिरcorona virusकोरोना वायरस बातम्या