शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

श्रावण मासातही कपालेश्वर मंदिर बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 19:04 IST

नाशिक: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून सोमवारपासून सुरू होत असलेल्या श्रावण मासातही कपालेश्वर मंदिर दर्शनासाठी बंद राहणार असल्याने यंदाही भाविकांना श्रावणात दर्शनापासून मुकावे लागणार आहे. मंदिर परिसरात होणारी गर्दी टाळण्यासाठी मंदिराकडे येणारे रस्ते भाविकांसाठी बंद ठेवण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. मात्र काेरोनाचे नियम पाहता, मुख्य मंदिरात मंदिरातील पुजारी व गुरवांना श्रावण महिन्यात नित्यनियमाने पूजन करण्यास मुभा देण्यात आली आहे.

ठळक मुद्देपोलिसांच्या सूचना मंदिराकडे जाणारे रस्ते बंद

नाशिक: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून सोमवारपासून सुरू होत असलेल्या श्रावण मासातही कपालेश्वर मंदिर दर्शनासाठी बंद राहणार असल्याने यंदाही भाविकांना श्रावणात दर्शनापासून मुकावे लागणार आहे. मंदिर परिसरात होणारी गर्दी टाळण्यासाठी मंदिराकडे येणारे रस्ते भाविकांसाठी बंद ठेवण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. मात्र काेरोनाचे नियम पाहता, मुख्य मंदिरात मंदिरातील पुजारी व गुरवांना श्रावण महिन्यात नित्यनियमाने पूजन करण्यास मुभा देण्यात आली आहे.

यासंदर्भात पंचवटी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी मंदिर पुजारी व विश्वस्तांची बैठक घेऊन भाविकांसाठी मंदिर बंद ठेवण्याबाबत सूचना दिल्या आहेत. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने शासनाने नियम शिथिल केले आहेत. त्यातच श्रावण महिना सुरू होत असल्याने देवदेवतांची मंदिरे भाविकांना देवदर्शनासाठी खुली करावी, अशी मागणी भाविक, पुजारी आणि साधू-महंतांनी केली होती. श्रावण महिन्यात भाविक विविध पूजाविधी, अभिषेकपूजन करत असल्याने दरवर्षी भाविकांची महादेव मंदिरात गर्दी व्हायची, मात्र यंदा सलग दुसऱ्या वर्षीदेखील कोरोना सावट असल्याने प्रशासनाने खबरदारी म्हणून सर्वच मठ, मंदिरे बंद ठेवण्याच्या मंदिर प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. त्यानुसार यंदाही श्रावण महिन्यात मठ, मंदिरे बंद राहणार असल्याने भाविकांना लांबून देवदर्शन घ्यावे लागणार आहे. 

येत्या सोमवारपासून श्रावण महिना सुरू होणार असून, शासनाने कोरोना खबरदारी म्हणून मंदिरे सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही, तरीदेखील दर सोमवारी व शनिवारी शेकडो भाविक कपालेश्वर मंदिराच्या बाहेर दर्शनासाठी गर्दी करतात. त्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेडिंग केले जाणार आहे,  असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत  यांनी सांगितले 

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसTempleमंदिर