‘कश्मीर से कन्याकुमारी, भारत माता एक हमारी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:26 IST2017-08-05T00:26:04+5:302017-08-05T00:26:23+5:30
देशातील विविध घडणाºया जातीय अथवा धार्मिक हिंसाचाराचा राष्ट्रीय सेवा दलातर्फे आॅगस्ट क्रांती लोकजागृती यात्रेच्या माध्यमातून निषेध नोंदविताना ‘कश्मीर से कन्याकुमारी, भारत माता एक हमारी’, अशी घोषणाबाजी करण्यात आली.

‘कश्मीर से कन्याकुमारी, भारत माता एक हमारी’
नाशिक : देशातील विविध घडणाºया जातीय अथवा धार्मिक हिंसाचाराचा राष्ट्रीय सेवा दलातर्फे आॅगस्ट क्रांती लोकजागृती यात्रेच्या माध्यमातून निषेध नोंदविताना ‘कश्मीर से कन्याकुमारी, भारत माता एक हमारी’, अशी घोषणाबाजी करण्यात आली.
आॅगस्ट क्रांती आंदोलन अमृतमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सेवा दलाच्या माध्यमातून नंदुरबार येथून निघालेल्या राज्यव्यापी आॅगस्ट क्रांती लोकजागर यात्रेचे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक वसंत हुदलीकर व पंडित येलमामे यांच्या उपस्थितीत हुतात्मा स्मारक येथे स्वागत करण्यात आले. यावेळी लोक सेवा दलाच्या सदस्यांनी विविध घोषणा देत राष्ट्रीय व सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला. ब्रिटिशांविरोधात ९ आॅगस्ट १९४२ मध्ये भारतीय क्रांतिकारकांनी पुकारलेल्या भारत छोडो आंदोलनाला बुधवारी (दि.९) ७५ वर्षे पूर्ण होत आहे. या आॅगस्ट क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या आॅगस्ट क्रांती लोकजागर यात्रेत पथनाट्य, गाणी, पोवाडे आदि विविध माध्यमांतून प्रबोधन करण्यात आले. शुक्रवारी सकाळी ४ आॅगस्टला निफाड येथून आलेल्या यात्रेचे नाशिक शहरातील हुतात्मा स्मारक येथे स्वागत करण्यात आले. यावेळी स्वातंत्र लढ्यात शहीद झालेल्या हुतात्मांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली. दुपारी रचना विद्यालय व केटीएचएम विद्यालयांमध्ये यात्रेत सहभागी झालेल्या सदस्यांनी राष्ट्रीय एकात्मता व मौलिक अधिकारांविषयी जनजागृती क रण्यात आली. आॅगस्ट क्रांती लोकजागृती यात्रेचे नाशिक शहरातील नियोजित कार्यक्रम आटोपल्यानंतर सिन्नरकडे प्रस्थान झाले.