कांदाफेको आंदोलन

By Admin | Updated: August 24, 2016 22:12 IST2016-08-24T22:00:19+5:302016-08-24T22:12:17+5:30

निफाड : शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध; तहसीलदारांना निवेदन

Kandapheko movement | कांदाफेको आंदोलन

कांदाफेको आंदोलन

निफाड : शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे नाशिक जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या कांद्याला आजही योग्य हमीभाव मिळत नसल्याने निफाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप बनकर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील कांदा उत्पादकांनी निफाड तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर कांदाफेको आंदोलन केले.
निफाड उपबाजार येथून मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चात शेतकरी मोठ्या प्रमाणात कांद्याने भरलेले ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले होते. शासनाविरोधी घोषणा देत मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला. दिलीप बनकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अनिल कुंदे, लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर, निफाड पंचायत समितीचे सभापती सुभाष कराड, जिल्हा बँकेचे माजी संचालक राजेंद्र डोखळे, निफाड मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष सिद्धार्थ वनारसे, प्रांतिक सदस्य भाऊसाहेब भवर, तालुका युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष विलास मत्सागर, महिला अध्यक्ष अश्विनी मोगल, विद्यार्थी सेनेचे प्रदेश सरचिटणीस सागर कुंदे, तालुकाध्यक्ष रतीश टर्ले, अश्पाक शेख, सुरेश कमाणकर, निफाडचे नगरसेवक देवदत्त कापसे, विक्र म रंधवे, रावसाहेब गोळे, संपत व्यवहारे, आरिफ मणियार आदिंसह कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते.
कांदाप्रश्नावर सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे, असे मत बनकर यांनी यावेळी व्यक्त केले. गोदावरीच्या पुरामुळे पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व घराचे व दुकानांचे नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीने भरपाई
मिळावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. राजेंद्र डोखळे, अनिल कुंदे, जयदत्त होळकर, सुभाष कराड, भाऊसाहेब भवर, विक्र म रंधवे, सिद्धार्थ वनारसे, संपत व्यवहारे, अश्विनी मोगल आदिंची
भाषणे झाली. यानंतर निफाडचे तहसीलदार विनोद भामरे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात
आले. निफाडचे पोलीस उपअधीक्षक दीपक गिऱ्हे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांच्या पोलीस पथकाने बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर)

Web Title: Kandapheko movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.