मंगळवारपासून कणकेश्वर महाराज यात्रोत्सवास प्रारंभ
By Admin | Updated: February 6, 2016 22:35 IST2016-02-06T22:33:53+5:302016-02-06T22:35:14+5:30
मंगळवारपासून कणकेश्वर महाराज यात्रोत्सवास प्रारंभ

मंगळवारपासून कणकेश्वर महाराज यात्रोत्सवास प्रारंभ
नांदूरशिंगोटे/ निऱ्हाळे : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील कणकोरी येथील कणकेश्वर महाराज यात्रोत्सवास मंगळवारपासूुन (दि.९) सुरुवात होत असून, यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती यात्रा समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
यात्रोत्सवानिमित्ताने विविध धार्मिक व करमणुकीच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी ७ वाजता कणकेश्वर महाराज मूर्तीवर अभिषेक, पूजा, आरती होणार आहे. दुपारी १ ते ५ वाजेपर्यंत भजनाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ७ वाजता गावातून कणकेश्वर महाराजांच्या प्रतिमेची सजवलेल्या रथातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. यावेळी शोभेच्या दारूची आतषबाजी करण्यात येणार आहे. रात्री करमणुकीसाठी आम्रपाली पुणेकर व राजू बागुल यांचा लोकनाट्य तमाश्याचा कार्यक्रम होणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी तमाशा कलावंतांचा हजेरी कार्यक्रम होणार असून, भाविक नवसपूर्तीसाठी सत्यनारायण पूजा करतात. दुपारी कुस्त्यांची दंगल होणार आहे. यावेळी बक्षिसे देऊन विजेत्या मल्लांना गौरविण्यात येणार आहे. यात्रेनिमित्ताने मंदिराला रंगरंगोटी करण्यात आली असून, मंदिरावर व परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. (वार्ताहर)
त्यामुळे हा परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे. मंदीर परिसरात स्वच्छता करण्यात आली आहे. यात्रेत विविध खेळणीची, मेवा-मिठाई, रहाटपाळणे आदी दुकाने थाटण्यास प्रारंभ झाला आहे. दोन दिवस सुरु रहाणाऱ्या यात्रेची ग्रामस्थ व यात्रा समितीच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. परिसरातील भाविकांनी यात्रोेत्सवातील विविध धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्याव असे आवाहन सरपंच नीलेश जगताप, सभाजी सांगळे, दगू माळवे, चंद्रकांत सांगळे, अनिल सांगळे, आण्णा उगले, दादू अहिरे, संजय सांगळे, वसंत सांगळे, संतोष सानप आदिंसह ग्रामस्थांनी केले आहे. (वार्ताहर)