कळवण रोटरी क्लबचे पदग्रहण
By Admin | Updated: July 30, 2014 00:22 IST2014-07-30T00:08:28+5:302014-07-30T00:22:49+5:30
कळवण रोटरी क्लबचे पदग्रहण

कळवण रोटरी क्लबचे पदग्रहण
कळवण : तालुक्यात विविध विकासकामांची सुरुवात करताना रोजगार या महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य देऊन कार्य करणाऱ्या रोटरी क्लब आॅफ कळवणचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन सहायक जिल्हाधिकारी आस्तिक पांडेय यांनी केले. सहायक रोटरी क्लब आॅफ कळवणच्या पदग्रहण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संमोहन तज्ज्ञ शैलेंद्र गायकवाड होते.
पांडेय म्हणाले की, क्लबमुळे शहरातील ३६ गरजू महिलांना शिलाई मशीन देऊन त्यांना स्वत:च्या उदरनिर्वाहाची व कुटुंबाला हातभार लावण्याची संधी उपलब्ध करून दिली. संमोहन तज्ज्ञ डॉ. शैलेंद्र गायकवाड यांनी संमोहन शास्त्रचे महत्त्व सांगत काही वेळासाठी संमोहित केले. यावेळी नूतन अध्यक्षपदी प्रा. आर. डी. भामरे, सेक्रेटरी संजय बगे, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी अनिता जैन, उपाध्यक्ष रोहिणी कापडणे, सेक्रेटरी मंजूषा देवघरे, रोटरेक्ट क्लबच्या अध्यक्षपदी निखिल रायते, विलास देशपांडे यांनी पदभार स्वीकारला.याप्रसंगी रोटरीचे विलास शिरोरे, मावळते अध्यक्ष डॉ. एस. बी. सोनवणे, डॉ. अनिल महाजन, रावसाहेब शिंदे, मोहनलाल संचेती, गंगाधर गुंजाळ, सुभाष जैन, इनरव्हील क्लबच्या माजी अध्यक्षा निर्मला संचेती, रोटरेक्ट क्लबचे पवन कोठावदे आदि उपस्थित होते.