स्वरांच्या मैफलीत कालिदास दिन साजरा

By Admin | Updated: June 29, 2014 00:45 IST2014-06-29T00:27:28+5:302014-06-29T00:45:54+5:30

स्वरांच्या मैफलीत कालिदास दिन साजरा

Kalidas celebrates the day in voice concerts | स्वरांच्या मैफलीत कालिदास दिन साजरा

स्वरांच्या मैफलीत कालिदास दिन साजरा

 

नाशिक : या जन्मावर... लग जा गले... शूर आम्ही सरदार... सांज ये गोकुळी... सुहाना सफर... अशा एकापेक्षा एक बहारदार हिंदी-मराठी गाण्यांच्या सुरेल मैफलीत कालिदास दिन साजरा करण्यात आला.
कालिदास कलामंदिर येथे नाशिक महानगरपालिका व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आलेल्या महाकवी कालिदास दिनानिमित्त नाशिक आर्केस्ट्रा असोसिएशनच्या वतीने ‘स्वर श्याम के’ या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. कौन है जो सपने मे आया, दिवाना हुवा बादल, वाऱ्यावरती गंध, ही चाल तुरू तुरू, मंै हु झुम झुम झुमरू, निशाना, ग सजनी, राजा ललकारी अशा एकापेक्षा एक बहारदार गीतांनी उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.
दरम्यान, याप्रसंगी मास्तर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारप्राप्त श्याम दशपुत्रे व गुणवंत कामगार पुरस्कारप्राप्त मिमिक्री कलावंत रमाकांत वाघमारे यांचा नाट्य परिषद व मनपाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी उपमहापौर सतीश कुलकर्णी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष नेताजी भोईर, कार्यकारणी सदस्य सुनील ढगे, नगरसेवक शाहू खैरे, अनिरुद्ध धर्माधिकारी, पल्लवी धर्माधिकारी, परिषदेचे उपाध्यक्ष रवींद्र कदम, राजेंद्र जाधव, आर्केस्ट्रा असोसिएशनचे अध्यक्ष उमेश गायकवाड आदि उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात बागेश्री वाद्यवृंदाच्या कलावंतांनी नटराजाची नांदी सादर केली. (प्रतिनिधी)

Web Title: Kalidas celebrates the day in voice concerts