कालभैरवनाथ महाराज यात्रोत्सवाची तयारी पूर्ण

By Admin | Updated: April 4, 2016 00:10 IST2016-04-03T23:26:20+5:302016-04-04T00:10:56+5:30

कालभैरवनाथ महाराज यात्रोत्सवाची तयारी पूर्ण

Kalbhairavnath Maharaj is preparing for the yatra | कालभैरवनाथ महाराज यात्रोत्सवाची तयारी पूर्ण

कालभैरवनाथ महाराज यात्रोत्सवाची तयारी पूर्ण

वडनेरभैरव : येथील कालभैरवनाथ महाराज यात्रोत्सव समितीच्या अध्यक्षपदी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष योगेश साळुंके यांची, तर उपाध्यक्षपदी साहेबराव शिंदे यांची निवड करण्यात आली. खजिनदार म्हणून ट्रस्टचे सरचिटणीस मुकेश वाघ यांची निवड करण्यात आली. सालाबादाप्रमाणे यंदाही कालभैरवनाथ महाराज व जोगेश्वरीमाता यात्रोत्सव दि. १२ ते २२ एप्रिल या कालावधीत होत आहे. यात्रोत्सवाची घटस्थापना १२ एप्रिलला सकाळी ८ वाजता होईल, दि. १८ एप्रिल रोजी देवतांची
(छबिना) मिरवणूक निघणार असून, दि. २० रोजी तेलवण कार्यक्रम व विधिवत पूजन होणार आहे. दि. २१ एप्रिल रोजी प्रत्यक्ष रथयात्रेला जानवस घरांच्या दिशेने प्रारंभ होणार आहे, तर दि. २२ एप्रिल रोजी परतीची रथ मिरवणूक होऊन शिंदवड, ता. दिंडोरी येथील खंडेराव महाराज दर्शनाने यात्रेची सांगता होणार आहे. यानिमित्ताने कालभैरवनाथ मंदिरात ग्रामस्थ, मानकरी व ट्रस्ट यांची बैठक झाली. बैठकीत ४१ सदस्यांची यात्रा उत्सव समिती तयार करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी ट्रस्टचे अध्यक्ष योगेश साळुंके, उपाध्यक्ष- साहेबराव शिंदे, खजिनदार- मुकेश वाघ, यांची निवड करण्यात आली. ग्रामस्थ व मानकरी यांनी विविध प्रकारच्या विधायक सूचना केल्यात. यावेळी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य संपतराव वक्टे, उपसरपंच रावसाहेब भालेराव, सुनील पाचोरकर, राजाभाऊ भालेराव, रामदास पाचोरकर, अमोल गचाले, संपतबाबा वक्टे, राजेंद्र निखाडे, नारायण मालसाणे, सुरेश मोगल, साहेबराव तिडके, दीपक जमधडे, विठ्ठल गचाले, सुहास भालेराव, उत्तम तिडके, विजय मोगल, तानाजी शिंदे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Kalbhairavnath Maharaj is preparing for the yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.