उमराणेत कलारंजन उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 14:51 IST2020-02-10T14:50:30+5:302020-02-10T14:51:19+5:30
उमराणे : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कलारंजन उत्सव कार्यक्र म घेण्यात आला. या प्रसंगी गटशिक्षणाधिकारी श्रीमती सुनीता धनगर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून कार्यक्र माचे उद्घाटन करण्यात आले

उमराणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संपन्न झालेल्या कलारंजन कार्यक्र मात नृत्याविष्कार सादर करताना विद्यार्थी.
ठळक मुद्देयेथील छत्रपती शिवाजी चौकात संपन्न झालेल्या कलारंजन कार्यक्र मादरम्यान बाल कलाकारांनी हिंदी व मराठी गाण्यांवर ठेका धरला. या वेळी समाज प्रबोधन करणाऱ्या एकांकिका, मराठी पोवाडे, लोकगीते आदी गाण्यांवर नृत्ये सादर करण्यात आली.
.कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य यशवंत शिरसाठ होते. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती धर्मा देवरे, विस्तारअधिकारी नंदकुमार देवरे, उपसरपंच शितल जाधव केंद्रप्रमुख दिलीप पाटील, रावबा मोरे, प्रशांत देवरे, बाळासाहेब देवरे, प्रकाश पाटील, योगेश जाधव, आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सूत्रसंचलन चंद्रकला भामरे व स्वाती शेवाळे यांनी केले. कार्यक्र म यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापक व सर्व शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापन समिती यांनी परिश्रम घेतले.