शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या काळाराम मंदिर विश्वस्तपदाचा वाद न्यायालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 20:12 IST

काळाराम विश्वस्त मंडळ सहा वर्षांसाठी असते. त्यात विश्वस्त मंडळाच्या एकूण दहा जागा असून त्यात घटनेनुसार जिल्हा व सत्र न्यायाधीश हे संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. विश्वस्तांच्या दहा जागांपैकी तीन जागा ह्या पुजारी घराण्यातील,

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : श्री काळाराम संस्थान विश्वस्त मंडळाच्या विश्वस्तपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने दहा विश्वस्तांच्या जागांपैकी अध्यक्षांनी निवडलेल्या तीन जागांवर एका माजी विश्वस्ताने हरकत घेत उच्च न्यायालयात दावा दाखल केल्याने तिघा विश्वस्तांची निवड वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

काळाराम विश्वस्त मंडळ सहा वर्षांसाठी असते. त्यात विश्वस्त मंडळाच्या एकूण दहा जागा असून त्यात घटनेनुसार जिल्हा व सत्र न्यायाधीश हे संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. विश्वस्तांच्या दहा जागांपैकी तीन जागा ह्या पुजारी घराण्यातील, तर तीन विश्वस्त जुन्या विश्वस्तातून निवडण्याचे अधिकार अध्यक्षांना आहेत व उर्वरित चार जागा धर्मादाय आयुक्तांकडून निवडल्या जातात. अध्यक्षांनी जुन्या विश्वस्त मंडळातील मंदार जानोरकर, वैद्य एकनाथ कुलकर्णी, दत्तप्रसाद निकम यांची अलिकडेच नियुक्ती केली आहे.२०१९ ते २५ या सहा वर्षांच्या कालावधीसाठी व घटनेत नमूद असलेल्या जुन्या सदस्यातून ३ सदस्य निवडतांना १४ आॅक्टो २०१९ रोजी बैठकीचा अजेंडा काढला आहे. त्यात बैठकीचे ठिकाण जिल्हा न्यायालयातील त्यांच्या स्वत:च्या निजी कक्षात दर्शविले आहे. मुळात संस्थेची बैठक अशा न्यायालय आवारात निजी कक्षात घेता येत नाही. दत्तप्रसाद निकम हे संस्थेचे संचालक असतांना त्यांनी संस्थेच्या कार्यक्रमात पत्नीच्या नावे गायनापोटी ११ हजार रुपये मानधन मिळवून दिले आहे. संस्थेच्या संचालकांनी स्वत:च्या किंवा कुटुंबातील कोणतीही व्यक्तीसाठी संस्थेच्या पैशाचा वापर करणे हे मुंबई सार्वजनिक विश्वस्त कायद्याने गुन्हा असल्याची हरकत माजी विश्वस्त पांडुरंग बोडके यांनी घेत न्यायालयात दावा दाखल केला आहे.दरम्यान, धमार्दाय आयुक्तांकडून नियुक्त केल्या जाणाºया चार जागांसाठी तब्बल ७२ इच्छुकांनी अर्ज केले होते. त्यातून सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त शांताराम अवसरे, अ‍ॅड. दिलीप कैचे, शुभम मंत्री, आणि डॉ. मिलिंद तारे या चौघांची निवड करण्यात आली. तर पुजारी घरण्यातून धनंजय पुजारी, मंगेश पुजारी, नरेश पुजारी यांची निवड करण्यात आली आहे.

 

टॅग्स :TempleमंदिरNashikनाशिक