काळाराम मंदिर नवरात्रोत्सवात सतारवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 00:38 IST2018-03-27T00:38:07+5:302018-03-27T00:38:07+5:30
येथील उस्ताद शाहीद परवेज गुरुकुलच्या विद्यार्थिनी मोहिनी कुलकर्णी, राधिका गोडबोले, अंजली नांदुरकर यांनी वासंतिक नवरात्र महोत्सवात सतारवर रामाची भजने सादर करीत श्रोत्यांना अनोखी अनुभूती दिली.

काळाराम मंदिर नवरात्रोत्सवात सतारवादन
नाशिक : येथील उस्ताद शाहीद परवेज गुरुकुलच्या विद्यार्थिनी मोहिनी कुलकर्णी, राधिका गोडबोले, अंजली नांदुरकर यांनी वासंतिक नवरात्र महोत्सवात सतारवर रामाची भजने सादर करीत श्रोत्यांना अनोखी अनुभूती दिली. शनिवारी (दि.२४) सकाळी ७ वाजता पंचवटीतील काळाराम मंदिर येथे हा कार्यक्रम पार पडला. भक्तिमय वातावरण श्रोते न्हाऊन गेले होते. यावेळी त्यांनी ‘गणनायकाय गणदैवताय’, ‘पायोजी मैने रामरतन धन पायो’, ‘हे राम’ आदी विविध भजने सादर केली. त्यांना बंटी गुरव (बासरी), अभिजित शर्मा (आॅक्टोपॅड), अनिल धुमाळ (की-बोर्ड), सतीश पेंडसे (तबला) यांनी साथसंगत केली. श्रोते या पवित्र वातावरणातील मंगलमय संगीतसुरांनी भारावून गेले होते.